धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक वेगळं रूप धाराशिवरांना पाहायला मिळाला आहे, मुख्यमंत्र्यांनी रात्री एक वाजता येऊन नव वधू-वरांना आशीर्वाद दिले आहेत. उमरगा लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. आमदार चौगुले यांच्या ज्येष्ठ मुलगा शुभम यांचा विवाह सोहळा धाराशिव येथील प्राचार्य मारुती शेरखाने यांची मुलगी स्नेहा हिच्याशी उमरग्यात मोठ्या थाटामटात पार पडला.
कोल्हापूर येथील शिवसेना पक्षाच्या मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री येऊन वधू-वरांना आशीर्वाद दिले, एकनाथ शिंदे येणार म्हणून लोकसुद्धा या लग्न मंडपात रात्री उशीरा उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांचे नवरूप या निमित्ताने धाराशिवरांना पाहायला मिळाले त्यांचे कौतुक सुद्धा उपस्थितांनी केले. या विवाह सोहळ्याला मंत्री संदीपान भुमरे, मंत्री संजय बनसोडे,खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार रवींद्र गायकवाड, शिवसेना नेते धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख मोहन पनूरे, जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, मित्र परिवार उपस्थितीत होता.