धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध कत्तलखाने व गोमांस विक्री विरोधात कारवाईसाठी मोहीम हाती घेतली आहे. धाराशिव शहरातील किरणी मळा या भागातील कत्तलखाने जमीनधोस्त केले असुन इमारतीचे बांधकाम, पत्र्याचे शेड काढून टाकण्यात आले आहेत.
पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे, आजवरची ही सगळ्यात मोठी कारवाई असुन बांधकामे जेसीबीने पाडण्यात आली आहेत. गोमांस विरोधी मोहीम पोलीस अधीक्षक यांनी हाती घेतली आहे.
नागरिकांना कुर्बानीसाठी कत्तलखान्याला जागा व इतर सुविधा द्याव्यात अशी मागणी यावेळी कुरेशी यांनी केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे, मुख्याधिकारी वसुधा फड,पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, एपीआय महेश क्षीरसागर, पठाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी हजर होते. पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त ठेवला होता.