Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक – माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढला ट्रॅक्टर मोर्चा

समय सारथी by समय सारथी
January 15, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1
VIEWS

शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले – पायातले हातात घेण्याची वेळ आणू नका

धाराशिव – समय सारथी

एकीकडे शेतीमालाचा भाव पाडून, निर्यातबंदी करून उद्योगपतींसाठी आयातीला मुभा द्यायची आणि उद्योगपतींचे भरमसाठ कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. गेल्या अडीच वर्षांच्या तुलनेत मागील वर्षभरात शेतकरी आत्महत्येत अडीच टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणून सरकारने मनाची नसेल तर जनाची लाज बाळगून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. पायातले हातात घेण्याची वेळ आणू नका, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्यातील सरकारला दिला.

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव येथे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेट्टी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना संबोधित केले.

राजू शेट्टी म्हणाले की, आज सोयाबीन ला भाव मिळत नाही, दुधाची दरवाढ तीन महिन्यांपर्यंत टिकते. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. सध्या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे देशातील 30 लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. प्रधान मंत्र्यांनी मित्र गौतम अदानी यांना पाम तेल आयात करण्यास परवानगी दिल्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा अशा मालाला मोठा फ्टका बसला आहे. त्यामुळे उद्योगपती श्रीमंत तर शेतकरी आणखी कंगाल होत आहे. देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जेवढी कर्जमाफी 65 टक्के संख्यात असलेल्या शेतकऱ्यांना दिली, त्या तुलनेत एक टक्का असलेल्या उद्योगपतींना दहापट कर्ज माफ करणाऱ्या सरकारला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. म्हणून शेतकऱ्यां चा सातबारा कोरा झाल्याशिवाय स्वस्थ बसून चालणार नाही. असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

संघटनेच्या विधी समितीचे अध्यक्ष ॲड. जाधव यांनीही सारकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली. संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, स्वाभिमानी पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील यांच्यासह अनेकांनी यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचा प्रश्नांवर चकार शब्दही बोलत नाहीत. कांदा निर्यात, दुध, ऊस दराबाबत कोणीही आवाज उठवला नाही. उलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ट्रॅक्टर मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. परंतु त्यांना यश आले नाही. आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ऊस दराबाबत काही गावांनी दर निश्चित करण्यासाठी एकवटल्यानंतर शेतात ऊस तोडणीसाठी टोळ्या पाठविणे बंद केले. सोलापूर- तुळजापूर – धाराशिव रेल्वे मार्गासाठी हजारो एकर जमीन संपादित केली तेव्हा चारपट भाव देण्याचे आश्वासन दिले. हे आश्वासन लोक्रतिनिधींनी पाळले नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मोर्चानंतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले.
मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, कार्याध्यक्ष रवीकिरण गरड, राज्य कार्यकारिणी सदस्य बिभीषण भैरट, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विष्णू काळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हाके, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, संपर्कप्रमुख किशोर गायकवाड, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नेताजी जमदाडे, तालुकाध्यक्ष गुरूदास भोजने, बाळासाहेब मडके, चंद्रकांत समुद्रे, तात्या रांजणीकर, पंकज पाटील, विकास मार्डे, प्रदीप जगदाळे, अमृत भोरे, दाजी पाटील, प्रदीप गाटे, चंद्रकांत नरुळे, नरसिंग पाटील, डॉ.अनिल धनके, अभय साळुंके, संजय भोसले, सुरेश नेपते, चंद्रकांत साळुंके, कल्याण भोसले, विजय सिरसट, बापूसाहेब थिटे, सुनील गरड, अ‍ॅड.वसंतराव जगताप, गजानन भारती, संतोष भैरट, शुभम पवार, रामेश्वर कारभारी, हुसेन शेख, शंकर घोगरे, रामेश्वर नेटके, शिवाजी ठवरे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या –

शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी, दुध दरवाढीवर तात्काळ शेतकर्‍यांना भाव दिला पाहिजे. शेतीमाल उत्पादनाच्या आधारित दीडपट हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांना वन्य प्राण्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी सरकारने 100 टक्के कुंपण योजना अनुदानित करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

Previous Post

महायल्गार मेळावा – धाराशिव येथे 24 जानेवारीला ओबीसी समाजाचा मेळावा, ‘हे’ नेते राहणार उपस्थितीत

Next Post

एक मराठा कोट मराठा  – मराठा आरक्षणासाठी धाराशीव ते तुळजापूर महावाहन रॅली

Related Posts

महाराष्ट्र

पहिला दिलासा – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात एका आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर, धाराशिव कोर्टाचे आदेश 

June 9, 2025
महाराष्ट्र

वाढीव कोठडी – आरोपी विनोद गंगणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कोर्टाने झापले 

June 9, 2025
महाराष्ट्र

कोर्टाने झापले, पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह – तुम्हाला आरोपी विनोद गंगणेला वाचवायचे आहे काय ? मोठ्या घडामोडी

June 9, 2025
महाराष्ट्र

‘बाप’वरून वाद, महायुतीत ठिणगी – आई तुळजाभवानी मंत्री राणे यांना सद्बुद्धी देवो, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके – डीपीसी निधी स्थगिती 

June 8, 2025
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट ठरली – ड्रग्ज तस्करी,खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील मांडणार मुद्दे 

June 8, 2025
महाराष्ट्र

15 घरफोड्यांचा सराईत गुन्हेगार अखेर गजाआड, 84 ग्रॅम सोने हस्तगत – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई

June 8, 2025
Next Post

एक मराठा कोट मराठा  - मराठा आरक्षणासाठी धाराशीव ते तुळजापूर महावाहन रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

पहिला दिलासा – तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात एका आरोपीला अटकपुर्व जामीन मंजुर, धाराशिव कोर्टाचे आदेश 

June 9, 2025

वाढीव कोठडी – आरोपी विनोद गंगणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कोर्टाने झापले 

June 9, 2025

कोर्टाने झापले, पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह – तुम्हाला आरोपी विनोद गंगणेला वाचवायचे आहे काय ? मोठ्या घडामोडी

June 9, 2025
June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp