धाराशिव – समय सारथी
ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा 17 जानेवारीचा धाराशिव जिल्हा दौरा रद्द झाला आहे. भुजबळ हे धाराशिव येथे ओबीसी संघर्ष यात्रेला संबोधन करण्यासाठी येणार होते मात्र त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला आहे. 17 जानेवारीच्या मेळाव्या बाबत अद्याप स्पष्टता आली नाही. ओबीसी मेळाव्याला कोण कोण कोण येणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ आता भुजबळ यांचा धाराशिव दौरा रद्द झाला आहे. शिंदे हे 10 जानेवारी, पवार हे 13 जानेवारी तर भुजबळ हे 17 जानेवारी रोजी धाराशिव दौऱ्यावर येणार होते मात्र या तिन्ही प्रमुख नेत्यांनी त्यांचे दौरे रद्द केले त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाडा व धाराशिव येथे पेटला असुन त्याचेही कारण सांगितले जात आहे.