धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील बहुचर्चित निसर्ग गारवा लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी नितीन शेरखाने याने जामिनीसाठी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात धाव घेतली असुन त्यावर आज 9 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे, सध्या शेरखाने हा धाराशिव येतील जेलमध्ये आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने सेक्स रॅकेटचा तपास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाकडे वर्ग करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ हे याचा तपास करीत आहेत. शेरखाने याच्या मोबाईल कॉल, बँक खाते व फोन पे रेकॉर्ड मागविले असुन यात अनेक जण रडारवर आहेत. कॉल व फोन पे माहिती आल्यावर याचा अधिक उलगडा होणार आहे.
मुख्य आरोपी नितीन शेरखाने यांचा जामीन न्यायाधीश व्ही जी मोहीते यांनी नाकारला होता त्यानंतर शेरखाने हा सध्या धाराशिव येथील जिल्हा कारागृहात आहे. शेरखाने याला वाचवण्यासाठी केलेल्या कागदोपत्री भाडेकराराचा बनाव कोर्टात उघड झाला असुन फोन पे व इतर माहिती समोर आली आहे
आरोपी नितीन शेरखाने याने सदरील लॉज 5 लाख रुपये डिपॉझिट व दरमहा 70 हजार रुपये भाड्याने मॅनेजरला दिल्याचे सांगत 20 सप्टेंबर 2022 रोजीचा एक भाडेकरार कोर्टात जामीन मिळवण्यासाठी सादर केला मात्र 5 लाख डिपॉजिट व दरमहा 70 हजार भाड्याची कोणतेही पुरावे व बँक स्टेटमेंट कोर्टात न दिल्याने हा भाडेकरार पुरावा शेरखाने याला अनैतिक कृत्य व अन्य बेकायदेशीर बाबीपासुन वाचवण्यासाठी ढाल म्हणून तयार केल्याचे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदविले आहे.
ग्राहकांकडुन आलेले पैसे हा नितीन शेरखाने स्कॅनरवर स्वतःच्या खात्यावर घ्यायचा त्यामुळे या सेक्स रॅकेटची मला माहिती नाही, मी नाही त्यातला हा पवित्रा कोर्टात खोटा ठरला. दलालीचे पैसे बँक खात्यावर घेतल्याने चांगलाच अडचणीत आला आहे. शेरखाने याने कोणा कोणाला महिला पुरवल्या व किती महिलांना जाळ्यात ओढत या वाम मार्गाला लावले याचा तपास सुरु आहे.
निसर्ग गारवा या लॉजवर वेश्या व्यवसाय केला जायचा यात प्रत्येक ग्राहकाकडुन 1 हजार 500 रुपये घेतले जायचे त्यातील 600 रुपये हे पिडीत महिलांना दिले जायचे व उर्वरित 900 रुपये हे मॅनेजरमार्फत शेरखाने याला जायचे. मॅनेजर दिलीप रामदास अडसूळे याला दरमहा 12 हजार रुपये देऊन नौकरीला ठेवले गेले होते शिवाय ग्राहक शोधून आणणारा रिक्षाचालक दलाल बालाजी चंद्रकांत गवळी याला प्रति ग्राहक 300 रुपये दिले जायचे असे समोर आले आहे. अश्या रीतीने शेरखाने याला प्रति ग्राहक 600 रुपये मिळत असत हे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून रेड केली यात त्यावेळी महिला सापडून आल्या, रोख रक्कम,नोंदीचे रजिस्टर सापडले.पोलिसांना लॉजवरील नोंदीचे रजिस्टर मिळाले असुन त्यात कोण कोण लाभार्थी आहे याचा तपास सुरु असुन ती नावे तूर्तास गुलदस्त्यात आहेत.पिडीत महिलांची सुटका करुन भादंवि कलम 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 4, 5 अन्वये शेरखाने, मॅनेजर व दलाल याच्या विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.