हत्याकांड प्रकरणात 5 जणावर गुन्हा नोंद, एकास अटक – धाराशिव पोलिसांचा तपास सुरु
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील भवानी चौक येथे भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी 5 जणावर गुन्हा नोंद केला असुन त्यातील एका आरोपीस अटक केली आहे. पोलिसांची 2 पथके इतर आरोपीना अटक करण्यासाठी रवाना झाली आहेत. अटक केलेल्या आरोपीला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.
पडवळ परिवारातील 2 भाऊ व त्यांचे 3 जावई यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हाताचे व पायाचे तुकडे होईपर्यंत हत्याराने वार करीत खुन करण्यात आला. अत्यंत नियोजनबद्ध रित्या या हत्याकांडाचा कट रचला गेला. कलम 302 सह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव शहरातील हत्याकांडात स्वतः पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी लक्ष घातले असुन आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी याची टीम तपास करीत फरार आरोपीचा शोध घेत आहे.
धाराशिव शहरातील सांजा रोड भागातील भवानी चौक येथे अज्ञात 2-3 जणांनी धारदार शस्त्रानी हल्ला करीत सांजा या गावातील राम किसन मोहिते यांचा खुन केला. हात पाय शस्त्रानी तोडून टाकल्याने रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला पोलिस घटनास्थळी पोहचले असुन त्यांनी शस्त्र जप्त करीत तपास सुरु केला आहे. शेतीच्या बांधावरून पुर्ववैमानस्यातुन हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी फरार असुन पोलिस शोध घेत आहेत.
भूम तालुक्यातील चिंचपूर येथे विवाहित महिलेचा अमानुष खून केल्याची घटना उघडकीस आली आहे . ही घटना आज उघडकीस आली . ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती कळतात भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी घटनास्थळास भेट दिली.