विषारी औषध टाकून मासे चोरणारी टोळी उघड – 8 जणांना धाराशिव पोलिसांनी केली अटक
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी धरणात विषारी द्रव्यरुपी औषध टाकून मासे चोरणाऱ्या टोळीला परंडा पोलिसांनी अटक केली असुन 8 जणांना अटक केली आहे. या टोळीतील सदस्य हे धरणाच्या पाण्यात विषारी औषध टाकायचे ज्यामुळे मासे मरून जात व पाण्यावर तरंगत असते व हे मासे ते बाजारात विकायचे. कोळंबी व इतर हे मासे पकडायचे.
मत्स्य व्यवसाय करण्यासाठी खासापुरी या धरणाचा ठेका गंगाफल या संस्थेच्या जियाउद्दीन मुजावर यांना 5 वर्षासाठी मिळाला होता त्यांनी धरणात मत्स्यबीज सोडले होते. तलावातील पाण्यात मासे पकडण्यासाठी काही जण रात्री यायचे व पाण्यात विषारी द्रव्य टाकत व मासे मेले की ते पकडून विकत.