राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीची शरद पवार यांची घोषणा
मुंबई – समय सारथी
राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीची शरद पवार यांनी घोषणा केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ही घोषणा केली. कुठं थांबायचं हे मला कळतं असे सांगत त्यांनी निर्णय घेतला मात्र समाजकार्य सेवा करणार असल्याचे सांगितले.
सार्वजनिक जीवनात आणखी काम करायचे आहे. लोकांनी आतापर्यंत साथ दिली, त्याबद्दल त्यांचे आभार, लोकांच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन, असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांच्या निवृत्तीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. साहेब आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असे सूचक विधानसभा शरद पवार म्हणाले होते. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याच असे सांगत जाहीर केले.