वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय नाना दंडनाईक यांच्यासह सर्व 16 संचालक फरार
धाराशिव – समय सारथी
अरविंद पतसंस्था घोटाळा प्रकरणी चेअरमन रोहितराज विजय दंडनाईक यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर आज 8 नोव्हेंबर रोजी न्यायाधीश किरण बागे पाटील यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. संचालक संजय बोंदर यांच्या सुद्धा अटकपुर्व जमिनावर आज सुनावणी होणार आहे.
पोलिसात 10 लाखांचा प्राथमिक गुन्हा नोंद असुन त्यातील 50 टक्के रक्कम दंडनाईक यांनी कोर्टात भरली आहे मात्र तपासात घोटाळ्याचा आकडा हा जवळपास 3 कोटी 50 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे त्यामुळे काय निर्णय येतो याकडे गुंतवणूकदार यांचे लक्ष लागले आहे.
अरविंद पतसंस्था घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंद केलेल्या तक्रारदार वाकुरे यांनी यापुर्वी रोहितराज दंडनाईक यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता. त्यामुळे एकाच फसवणूकीच्या गुन्ह्यात 2 स्वतंत्र गुन्हे नोंद होऊ शकत नाहीत त्यामुळे गुन्हा रद्द करावा अशी भुमिका आरोपीचे वकील ऍड मिलींद पाटील यांनी मांडली आहे तर तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या आजवरच्या तपासात फसवणूकीचा आकडा साडे तीन कोटी कोटीच्या पुढे गेल्याचे लेखी दिले आहे.
शिवाय मूळ एफआयआर गुन्ह्यात वाकुरे सोडून अन्य लोकांची तक्रारदार म्हणून नावे आहेत तर गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस चौकशीत अनेक नवीन तक्रारदार समोर आले असुन त्यातील काहीनी कोर्टात शपथपत्र व वकीलपत्र दाखल केले आहे. प्रत्येकाने वेगळा गुन्हा व कोर्टात जायचे का ? अशी बाजु गुंतवणूकदार यांचे वकील ऍड अजित खोत यांनी मांडली आहे. सरकारी वकील शरद जाधवर यात काम पाहत आहेत.
एकंदरीत अनेक कायदेशीर तांत्रिक मुद्दे व 3 कोटी 50 कोटी फसवणूक आकडा यावर कोर्ट काय निर्णय देते याकडे गुंतवणूकदार यांचे लक्ष लागले आहे.
वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणी चेअरमन तथा मुख्य सुत्रधार आरोपी विजयकुमार उर्फ नाना दंडनाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी नाकारला असुन अनेक महत्वाच्या बाबी व निरीक्षणे आदेशात नोंदविली आहेत. चेअरमन दंडनाईक यांचा बँक घोटाळ्यातील सहभाग अधोरेखित करीत पोलीस तपासाची गरज असल्याचे सांगत अटकपुर्व जामीन फेटाळला आहे, त्याच कोर्टात अरविंद पतसंस्थाची सुनावणी होत आहे.
आर्थिक घोटाळ्याने समाजाचे दूरगामी नुकसान – कोर्ट
आर्थिक घोटाळ्यात समाजाचे व लोकांचे गुंतवणूकदार यांचे दूरगामी नुकसान होते, सर्वोच्च न्यायालयासह अन्य आदेशाचा दाखला दिला आहे. दंडनाईक यांनी पत्नी व मुलगा यांच्या बचतगट व साखर कारखाना यात गुंतवणूक केली त्यामुळे या दोन्ही संस्था रडारवर आहेत तर दूध संघासह दंडनाईक परिवाराने शासकीय योजना व लाभ लाटण्यासाठी उभे केलेले काही उद्योग रडारवर आहेत.
वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणात तत्कालीन व्यवस्थापक दीपक देवकते व संचालक हरिश्चंद्र शेळके यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 7 नोव्हेंबर रोजी झाली आहे, त्यावर पुढील माहिती हाती आली नाही. व्यवस्थापक देवकते हे चेअरमन विजय दंडनाईक यांच्या आदेशाने बँकेचा कारभार हाकत होते त्यामुळे त्यांची या घोटाळ्यात व आर्थिक कारभारात महत्वाची भुमिका आहे.कर्ज मंजुर, वितरणसह अनेक कागदपत्रावर देवकते यांच्या सह्या असुन ते या घोटाळ्याची पोलखोल करू शकतात, देवकते यांच्याकडे त्यावेळी तिजोरीच्या चाव्या होत्या.