धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा दोन कुटुंबाच्या राजकारणाभोवती फिरत असून, त्या कुटुंबातील दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे राहून जनतेची दिशाभूल करत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी आता तिसरा आणि सक्षम पर्याय शोधण्याची वेळ आली आहे असे आमदार रोहित पवार म्हणाले.
धाराशिवमध्ये अनेक वर्षांपासून दोन कुटुंबाभोवती राजकारण फिरत आहे. निवडणुका आल्या की दोन भावंडे एकमेकांच्या विरोधात उभी राहतात, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नांवर ठोस काम होत नाही. ‘तू कर मारल्यासारखे, मी करतो रडल्यासारखे’ अशा पद्धतीचे राजकारण सुरू आहे.”
राजकीय संघर्षात जिल्ह्याचा अपेक्षित विकास झाला नाही, मात्र संबंधित नेत्यांचा आणि त्यांच्या राजकीय प्रभावाचा विस्तार मात्र झाला आहे. त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील जनतेने विकासकेंद्रित पर्यायाचा गंभीरपणे विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. रोहित पवार हे शेतकरी मेळावा आणि कर्जमाफी दौऱ्याच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यात आले होते.












