धाराशिव – समय सारथी
शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यापुर्वी शिवसेनेच्या काही पदाधिकारी यांच्यासह जवळपास 40 ते 50 शिवसैनिकांना पोलीसांनी स्थानबद्ध करीत नजर कैदेत ठेवले. या घटनेनंतर शिवसैनिक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची सोलापूर येथे भेट घेत व्यथा मांडल्या, शिंदे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. मारामारी करायची काय ? मला भावना कळल्या निर्णय घेऊ असे म्हणत आश्वासन दिले.
बैठकीनंतर काही पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बरखास्त,
अखेरीस सत्याचा विजय अटळ असतो.भगवान के घर में देर है, अंधेर नहीं अश्या पोस्ट टाकल्यानंतर चर्चेला उधाण आले. धाराशिव जिल्ह्याची शिवसेना कार्यकारिणी बरखास्त होणार असा दावा या गटाने केला. या बैठकीनंतर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.
कळंब, तुळजापूर व धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत झालेल्या तिकीट वाटप घोळावर शिवसैनिक आक्रमक झालेले दिसले. ताकत कमी आहे असे कारण पुढे केले जाते मात्र शिवसेनेच्या जागेवर भाजप उमेदवार यांना धनुष्यबाण चिन्हावर तिकीट दिले जाते, ते निवडून येतात. शिवसैनिक यांच्यावर विधानसभा निवडणुकीपासून अन्याय होत आहे असे म्हणत व्यथा मांडली. आम्हाला उमेदवारी तरी देऊन पहा, पक्ष श्रेष्टी यांना चुकीची दिशाभुल करणारी माहिती दिली जाते असा आरोप केला.












