धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते सिद्धार्थ अंगुल भाऊ बनसोडे यांनी काँग्रेस सदस्यत्व व मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक गटबाजीमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हणतले आहे, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
बनसोडे हे इतर नगरसेवक सोबत भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत, युवा नेतृत्व व तळागाळात काम करणारा चेहरा अशी त्यांची ओळख असुन दांडगा जनसंपर्क आहे. अनेक सामाजिक चळवळी, विषय व आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात हे पक्ष प्रवेश होणार आहेत












