धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील काँग्रेसचे 3 नगरसेवक पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असुन ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. आज मुंबई येथे एक बैठक असुन त्यानंतर निर्णय होऊ शकतो. बनसोडे व जोगदंड हे 2 नगरसेवक आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात हे पक्ष प्रवेश होणार आहेत, नगर परिषदेत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेसच्या 3 पैकी 2 नगरसेवक भाजपात गेल्यास काँग्रेसचा गट फुटणार असुन पक्षांतर बंदी कायदा लागु होणार नाही, नगरसेवक पद अबाधित राहते.
धाराशिव नगर परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असुन 41 पैकी 22 नगरसेवक भाजपचे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गट 8, शिवसेना उबाठा 7, काँग्रेस 3 व एमआयएम 1 असे संख्याबळ आहे. प्रभाग 15 मधुन सिद्धार्थ बनसोडे, प्रभाग 18 मधुन उज्मासबा अजहर खान पठाण व प्रभाग 1 मधुन अक्षय जोगदंड हे 3 काँग्रेस नगरसेवक निवडुन आले आहेत.












