धाराशिव – समय सारथी
तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार, अट्रॉसिटी आणि शस्त्र अधिनियमाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शामसुंदर दयानंद इंगळे (वय ३५ वर्षे रा. मसला खुर्द ता तुळजापूर) याचा नियमित जामीन विशेष सत्र न्यायाधीश धाराशिव यांनी मंजूर केला आहे. ऍड एम बी माढेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. ऍड धर्मराज अजित सरडे आणि ऍड विशाल बारकुल, ऍड दिग्विजय वारे व स्वप्निल बोबडे यांनी सहकार्य केले
एका 32 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४/१, ३५१२, ३५१३) सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३/२). ३०) ३२) आणि शस्त्र अधिनियम कलम ३. २५ अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं २७/२०२६) नोंदवण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, आरोपीने तिला मसला (खु) येथून तुळजापूरला बस नसल्याने दुचाकीवर सोडतो असे म्हणून मोटारसायकलवर बसवले व पुढे जाऊन शेतातील ज्वारीचे पिक बघायचे आहे, आपण जरा ज्वारीचे पिक बघून घेऊ असे म्हणून जवळच असलेल्या ज्वारीच्या पिकाजवळ गाडी उभा करुन गाडीवरुन उतरायला सांगीतले व गाडीवरुन उतरले असता फिर्यादीचे हाताला धरुन ज्वारीचे पिकात ओढत घेऊन गेले व आरडाओरडा करीत असताना आरोपीजवळ असलेल्या बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला अशा स्वरुपाची फिर्याद तामलवाडी पोलीस स्टेशनला देण्यात आली.
बचाव पक्षाने युक्तिवाद केला, त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की आरोपीवर लावलेले आरोप हे पुराव्याअभावी निराधार आहेत व सदर आरोपीस खोटया गुन्हयामध्ये गोवलेले असून प्राप्त पुराव्याच्या आधारे आणि तपासाच्या अनुषंगाने आरोपीला जामीन मिळणे न्यायोचित ठरेल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेऊन विशेष सत्र न्यायाधीश धाराशिव यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरलाआणि आरोपी शामसुंदर इंगळे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.











