धाराशिव – समय सारथी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी धाराशिव शहरात “प्रमुख नागरिक संगोष्ठी” (परिसंवाद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपालजी हे संवाद साधणार आहेत. हा परिसंवाद गुरुवारी 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान परिमल मंगल कार्यालय, नाईकवाडी नगर येथे होणार आहे. यां कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचे आवाहन धाराशिव जिल्हा संघचालक ऍड रविंद्र हरिदास कदम यांनी केले आहे.
आपल्या राष्ट्राच्या उभारणीत प्रत्येक क्षेत्राचे स्वतःचे असे महत्त्व आहे. आपल्या क्षेत्रात समर्पण व बांधिलकीने कार्य करून समाज आणि राष्ट्राची सेवा करणे आद्य कर्तव्य आहे, राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देत असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधत विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील निवडक प्रमुख प्रमुख नागरिक, अधिकारी तसेच समाजावर प्रभाव असणाऱ्या मान्यवर व्यक्तींमध्ये समाज राष्ट्रहितासाठी विचारांचे आदान-प्रदान होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा अनुभव, दृष्टीकोन आणि मार्गदर्शनाचा संगम घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विचारमंथनातुन नवी ऊर्जा आणि समाजहिताच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 15 मिनिटे आधी उपस्थित राहावे असे आवाहन ऍड कदम यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी ऍड सचिन सुर्यवंशी व ऋषीकेश धाराशिवकर यांच्याशी संपर्क साधावा.












