धाराशिव – समय सारथी
छत्रपती संभाजीनगर विभागातील महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघ प्रथमच विजेता झाला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे नेतृत्व आणि अष्टपैलू खेळ आणि धाराशिव क्रिकेट टीमच्या उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय शक्य झाला.
अंतिम सामन्यात नांदेड संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. धाराशिव क्रिकेट संघाने फलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 12 षटकात 145 धावांचा डोंगर उभा केला. सदर धावसंख्येचा पाठलाग करताना नांदेड संघ 134 धावांत गारद झाला. एका बाजूने इतर गोलंदाजांना धावा निघत असताना स्वतः जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी 2 षटकांत केवळ 13 धावा देऊन मुख्य फलंदाजास बाद केले आणि हा सामना धाराशिवच्या बाजूने झुकवला. त्यांना गोलंदाजीमध्ये शरद मोटे आणि अनिकेत राऊत या गोलंदाजांनी उत्कृष्ट साथ दिली.
धाराशिव क्रिकेट संघात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार(कर्णधार), कळंब तहसीलदार हेमंत ढोकले(उप कर्णधार), प्रसाद साळुंके, शरद मोठे, शुभम काळे, विनोद चुकेवाड, ओंकार पवार, रणधीर भोसले, आकाश वानखेडे, रणदीप सूर्यवंशी, अनिकेत राऊत, शिवराज खुर्दे, किरण पाटील, शिवराज शिंदे, सुरज घोसले यांचा समावेश होता. क्रिकेट सोबत तसेच इतर सर्व वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्येही धाराशिव जिल्हाने यावर्षी चमकदार कामगिरी केली.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट निवेदक म्हणून श्रीमती मृणाल जाधव(तहसीलदार धाराशिव) आणि संतोष पाटील(नायब तहसीलदार) यांना प्रथम क्रमांक मिळाला. नायब तहसीलदार प्रियांका लोखंडे, विशाखा बलकवडे, समाधान जावळे,बालाजी लाकाळ,अनिता पाटील,विष्णू थोरात,प्रकाश चंदनशिवे ल,महेश क्षीरसागर,रोहन शिंगाडे
शीतल आमझरे,नंदिनी,दीपा मुळूक हे वरील कलाकार समूह नृत्य प्रकारातील आहेत.यांना विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. वैयक्तिक नृत्यमध्ये तेजश्री जगदाळे यांना विभागात द्वितीय क्रमांक मिळाला आहे .
200 मीटर स्पर्धेत पुरुष गटात अफसर शेख द्वितीय, मोनिका मसुडगे भालाफेक प्रथम, वैष्णवी मसे प्रथम,रनिंग 200 मीटर दुसरा विष्णू थोरात 3 किमी चालणे प्रथम प्रभावती उंबरे टेबल टेनिस ,प्रथम व रिंग टेनिस द्वितीय धाराशिव जिल्हाने इतिहासात प्रथमच ही कामगिरी बजावली.
संघाला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, दत्तू शेवाळे, गणेश शिंदे, प्रवीण धरमकार ,संतोष राऊत , स्वाती शेंडे,अरुणा गायकवाड,सहायक जिल्हाधिकारी रेवय्याह् डोंगरे निवासी उपजिल्हाधिकारी श्री विद्याचरण कडावकर यांचे मार्गदर्शन लाभले.धाराशिव जिल्हाने इतिहासात प्रथमच ही कामगिरी बजावली.
धाराशिव संघाला अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, दत्तू शेवाळे, गणेश शिंदे, प्रवीण धरमकार,संतोष राऊत,स्वाती शेंडे,अरुणा गायकवाड,स.जिल्हाधिकारी रेवय्याह् डोंगरे निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांचे मार्गदर्शन लाभले.











