Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

गुन्हा नोंद – कलेच्या नावावर वेश्या व्यवसाय, 4 कला केंद्रावर घडला प्रकार, 9 आरोपी, रॅकेट – धाराशिव जिल्ह्यातील घटना

समय सारथी by समय सारथी
March 19, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्यातील 3 कला केंद्रावर एका विवाहित महिलेला कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला असुन पीडितीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार तिला धाराशिव जिल्ह्यातील पिंजरा, महाकाली व साई कला केंद्र या 3 तर लातुर जिल्ह्यातील बुधडा कला केंद्रात बळजबरीने डांबून ठेवुन मारहाण करण्यात आली. ग्राहकांसोबत पैशाच्या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश या महिलेने केला असुन आपबिती सांगितली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच हे प्रकरण समोर आले आहे. महाकाली केंद्र सोडले तर इतर 4 केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या अहवालानंतर कायमस्वरूपी बंद केला आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी चुकीचे प्रकार करणाऱ्या कला केंद्रावर कारवाईचे निर्देश दिले होते. या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशीची मागणी होत आहे.

पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर पिटा कायदा व भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 3(5), 351(3) व 64(2)(m) अन्वये पुणे ग्रामीण येथील वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असुन तपासासाठी हे प्रकरण धाराशिव ग्रामीण पोलिसाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणी पुणे वाघोली येथील सोनाली वाघ, लातुर येथील सचिन चंद्रकांत कापसे, सोनाली चंद्रकांत कापसे, अजय कापसे, माधुरी गिरी, अनिता कापसे व कविता कोळपेकर, बीड परळी येथील माधुरी गिरी व धाराशिव येथील अंजली अशा 9 संशयित आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणात कला केंद्रवरील आणखी कोणी सहभागी आहेत का ? इतर कोणावर अत्याचार झाला आहे का ? यांचा तपास पोलिस करीत आहेत. 

एका पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती विवाहित होती मात्र नवरा तीला दारू पिऊन मारहाण करीत होता. तीने तीच्या संसाराची आपबिती तिची मैत्रीण सोनाली वाघ हिला सांगितली त्यानंतर पतीच्या त्रासाला कंटाळुन ती येडशी येथील पिंजरा कला केंद्रात आली. तिथे तीने तिची ओळख मालकीण असलेल्या कविता कोळपेकर हिच्याशी करून दिली. मैत्रिणीने तिथे मॅनेजर असलेल्या सचिन चंद्रकांत कापसे याच्याशी ओळख करून दिली. तेथे सचिन कापसे हा ग्राहक आले की त्यांचेशी बोलनी करुन ग्राहकांना मुली दाखवायचा व ग्राहक मूली पसंद करुन त्यांना वेश्यागमनासाठी कला केन्द्र बाहेर घेऊन जायचे.

जेव्हा पिडीत महिलेला हा प्रकार समजला तेव्हा तीने कला केद्राबाहेर जाणेसाठी हट्ट केला असता तेथील मालकिन कविता कोळपेकर हिने मारहाण करुन डांबुन ठेवले. मारहाण केल्यानंतर एका ग्राहकासोबत सचिन हा येडशी येथील एका लॉजवर घेऊन गेला व तिथे अनैतिक संबंध ठेवले. लग्नाचे आमिष देऊन सचिन याने संबंध ठेवले त्यानंतर त्याची सख्खी बहीण सोनाली चंद्रकांत कापसे हिच्याकडे साईनगर लातुर येथे घेऊन गेला.

सोनाली कापसे या अगोदर पिंजरा कला केंद्र येथे होती, साईनगर येथे पीडितेला काही दिवस ठेवलेनंतर तिथे मारहाण करायला सुरुवात झाली. त्यांनी मिळून पीडितेला बुधडा कला केन्द्र, औसा रोड, लातुर येथे रेखा जाधव या मालकीनीकडे 30 हजार रुपये घेऊन कामाला ठेवले, तिथेही तीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. सोनाली कापसे व अनिता कापसे हे पिडीत महिलेला महाकाली कला केंद्र येरमाळा येथे घेऊन गेले. तेथे माधुरी गिरी मालकिनकडे या तिघी राहिल्या तेथेही मालकिन माधुरी गिरी ग्राहकांकडुन पैसे घेऊन वेश्याव्यवसाय करुन घेत होती. साई कला केंद्र नावाची पार्टी सोनाली कापसे हिने काढुन काढली तेथेही वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. 

गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी काही आरोपीनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणी दरम्यान ऍड अमोल वरुडकर यांनी बाजु मांडली. सदर तक्रार ही आकसापोटी करण्यात आली असून, आरोपीचा यातील सहभाग तपासात अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपी तपासाला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून, त्याची कोणतीही रिकव्हरी बाकी नसल्याने पोलिस कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. संशयित आरोपी कविताच्या वतीने वकिलांनी केलेला युक्तिवाद गाह्य धरून जामीन मंजुर करण्यात आला. ऍड वैभव खांडेकर, ऍड बालाजी पोतदार,ऍड सचिन जाधव, ऍड जनक साळुंखे, अँड विक्रम माने, ऍड दीपक तुपसुंदरे यांनी काम पाहिले.

Previous Post

उच्च न्यायालय – बँक व पोलिसांनी संशयाच्या आधारे गोठवले होते खाते, अनफ्रीझ करण्याचे आदेश

Related Posts

महाराष्ट्र

उच्च न्यायालय – बँक व पोलिसांनी संशयाच्या आधारे गोठवले होते खाते, अनफ्रीझ करण्याचे आदेश

March 18, 2026
महाराष्ट्र

लक्षवेधी – विधानसभेत आमदार सुरेश धसांनी उठवला आवाज, बोगस बांधकाम कामगार नोंदी, योजना लाटल्या

March 17, 2026
महाराष्ट्र

वाचवतंय कोण ? गुन्हा नोंद होणार – तुळजापूर यात्रा मैदान घोटाळा, बनावट रेखाकन नकाशे

March 17, 2026
महाराष्ट्र

कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय – स्वरांजली केंद्रावर धाड, 25 महिलांची सुटका, पुजा गायकवाडचा समावेश

March 17, 2026
महाराष्ट्र

गोळीबारातील जखमी सागर मोहळकरचा मृत्यु – डॉन निलेश घायवळला मारल्याचा घेतला बदला पुर्ण

March 16, 2026
महाराष्ट्र

राजकारण – डिजिटल बॅनर अनधिकृत – धाराशिव शहराचे विद्रुपीकरण, अध्यक्ष उपाध्यक्षांनीच मोडले नियम

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

गुन्हा नोंद – कलेच्या नावावर वेश्या व्यवसाय, 4 कला केंद्रावर घडला प्रकार, 9 आरोपी, रॅकेट – धाराशिव जिल्ह्यातील घटना

March 19, 2026

उच्च न्यायालय – बँक व पोलिसांनी संशयाच्या आधारे गोठवले होते खाते, अनफ्रीझ करण्याचे आदेश

March 18, 2026

लक्षवेधी – विधानसभेत आमदार सुरेश धसांनी उठवला आवाज, बोगस बांधकाम कामगार नोंदी, योजना लाटल्या

March 17, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp