धाराशिव – समय सारथी
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, देवगिरी प्रांत जिल्हा धाराशिव व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी एक दिवस मोफत रिक्षा प्रवास सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश अभिश्री देव, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील, जिल्हा शासकीय अभियोकता ऍड महेंद्र देशमुख, धाराशिव विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ऍड अमोल वरुडकर, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ऍड रवींद्र कदम, अधिवक्ता परिषदेचे धाराशिव अध्यक्ष अविनाश मैंदरकर, जिल्हा महिला प्रमुख ऍड दिपाली जहागीरदार यासह मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रिक्षाचालक यांचा सत्कार करून त्यांना या उपक्रम राबविणेबाबत सुचना देण्यात आल्या.
धाराशिव शहरातील गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी ह्या रिक्षा दिवसभर महिलांना मोफत प्रवास सेवा देणार असुन यात महिला स्त्री रुग्णालय, शासकीय रुग्णालय परिसरासह बसस्थानक, मुख्य बाजार पेठ या ठिकाणाचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमास ॲड कुदळे सुजाता,ॲड गौरी ठोंबरे,ॲड गोसावी आशा,ऍड निपाणीकर कल्पना,ॲड नवले अर्चना,ॲड कदम भाग्यश्री,ॲड भोसले वडणे मैना,ॲड भाग्यश्री रणखांब, ऍड अरुणा गवई, ऍड कल्पना ताकभाते, ॲड विजया घोगरे,ॲड श्वेता बनसोडे, महिला अधिवक्ता तसेच ऍड संदीप माढेकर, संघटन मंत्री अधिवक्ता परिषद,ऍड किरण कोळपे,ॲड सचिन मिनीयार, ॲड प्रवीण क्षीरसागर, ॲड अभिजीत भोरे,ॲड अभय पाथरूडकर, ऍड प्रसन्न देशमुख, ऍड खोसे उपस्थितीत होते.
अधिवक्ता परिषद वर्षभर राबवीत असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रम पैकी महिला दिनानिमित्तचा हा एक प्रमुख उपक्रम आहे.











