धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असुन अध्यक्षपदाची माळ अर्चना पाटील यांच्या रूपाने पहिल्यादा भाजपच्या गळ्यात पडली आहे. ये तो झांकी है, लोकसभा अभी बाकी है. करून दाखवलं, विश्वासहार्य नेता असे म्हणत भाजप शहराध्यक्ष नगरसेवक राहूल काकडे यांनी मल्हार पाटील यांचा निवडणुकपुर्वी व विजयानंतरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीने निर्विवाद विजय मिळवला आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाच्या अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उषा रवींद्र गायकवाड या विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर मल्हार पाटील. यांच्या नियोजनाचे कौतुक माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यासह अन्य नेत्यांनी केले.
भाजपाचे नेते मल्हार पाटील यांनी नगरपरिषद निवडणुकीनंतर केलेले एक वक्तव्य पुन्हा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नगर परिषद निवडणुकीच्या निकालात मिळालेल्या यशानंतर मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधता जोरदार टीका केली होती. धमक असेल तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून दाखवा, मल्हार पाटील नाव बदलतो असे ओपन चॅलेंज दिले होते.
लोकसभेच्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर आणि एका विशिष्ट समाजाच्या मतांवर माझ्या माऊलीला पराभूत केल्याचा अतिशय राक्षसी आनंद खासदाराला झाला होता. मात्र त्या आनंदाला आता जनतेनेच उत्तर दिले असून, त्याची खरी औकात मायबाप जनतेने दाखवून दिली आहे, असा घणाघाती टोला मल्हार पाटील यांनी लगावला होता.
विरोधकांचा बाजार उठला असुन आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील. कसाय दणका 2 असा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तसेच रडू नको बाळा.. नादी लागु नको, बदाबदा बडवीन गाण्यावर ठेका धरत मल्हार पाटील यांनी दंड थोपटले.











