धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देवानंद रोचकरी, मंगरूळ जिल्हा परिषद सदस्य सीमा ताई माडजे रोचकरी यांनी शिवसेना नेते आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी रोचकरी यांनी सावंत यांना समर्थन दर्शवीत एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला. रोचकरी ह्या समाजवादी पार्टीकडुन निवडुन आल्या आहेत.
अध्यक्षपदाच्या निवडीच्या अनुषंगाने ही भेट महत्वाची मानली जात आहे. शिवसेनेने अध्यक्षपदावर दावा केला असुन पक्षश्रेष्टीचा निर्णय अंतीम असणार आहे.












