धाराशिव – समय सारथी
पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास रामदास आरदवाड यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना तुळजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात रंगेहात पकडण्यात आले. पोलीस स्टेशन तुळजापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरु आहे.सरकार तर्फे फिर्याद पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी दिली.
पोलीस स्टेशन तुळजापूर येथे त्याचेवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी यापूर्वी 10 हजार रुपये घेऊन देखील, परत गुन्ह्यात कलम वाढ न करण्यासाठी व गुन्ह्यात गाडी जप्त न करण्यासाठी 15 हजार रुपयेची मागणी करण्यात आली परंतु तक्रारदार यांना पोलीस आरदवाड यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांचेकडे तक्रार दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी करीता तक्रारदार व पंच यांना पोलीस स्टेशन तुळजापूर येथे पाठवून लाच मागणी पडताळणी केली असता आरदवाड व तक्रारदार यांची पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भेट झाली. भेटीदरम्यान त्यानी तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ न करणेसाठी व गुन्ह्यात मोटार सायकल जप्त न करणेसाठी यापूर्वी 15 हजार मागितलेचे व तडजोडी अंती 5 हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपास अधिकारी म्हणुन विजय वगरे पोलीस निरीक्षक तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणुन पोलिस उप अधीक्षक योगेश वेळापुरे यांनी पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले. सापळा पथकात पोहेकॉ आशिष पाटील, पोलिस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी व चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.











