धाराशिव – समय सारथी
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये कुख्यात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर 4 मार्चला भरवस्तीत गोळीबार करण्यात आला असुन तो यात गंभीर जखमी आहे. न्युरानी कॉलनी भागात मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी 7 राऊंड फायर केले, ज्यापैकी 4 गोळ्या अंगात घुसल्याने सागर गंभीर जखमी झाला आहे. तो पुण्याचा डॉन बॉस निलेश घायवळवर हल्ला केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत होता.
जामखेड शहरातील न्युरानी काँलनी येथे बुधवारी सायंकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली असून कुख्यात गुंड सागर मोहळकर हाजखमी झाला आहे. सागर नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला होता अनेक गुन्हे असलेला सागर मोहळकर असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन एनसी दाखल केली होती. तो नशेच्या आहारी आसायचा जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत होती.
गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड पोलीसांनी ताबडतोब त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले नंतर शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले व नंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला हलवले.
भुम तालुक्यातील आंद्रूड येथील यात्रेत कुस्ती स्पर्धेच्या मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात डॉन असलेल्या निलेश घायवळ व पैलवान सागर मोहोळकर विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पैलवान सागरने कुस्तीच्या मैदानात बॉस निलेशच्या श्रीमुखात चापट मारली होती त्यानंतर पैलवान याला घायवळ याच्या समर्थकांनी यथेच्छा मारहाण केली, या दोघांनी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकारणी भारतीय न्याय संहिता कलम 194 (2) नुसार गुन्हा नोंद केला होता.












