धाराशिव – समय सारथी
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या जिल्ह्यात गेली वर्षभरात राबवलेल्या १५ उपक्रमांची आता जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वंचित, कामगार, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आदी घटकांसाठी काकडे यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण १५ उपक्रमांची जगभरात संशोधनाच्या माध्यमातून चांगले काम पुढे आणणार्या नेचर (युनायटेड किंगडम) आणि सायन्स (युनायटेड स्टेट्स ऑफ (अमेरिका) या दोन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या संशोधन मासिकाने दखल घेतली आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे हे आता जगातले ’प्रयोगशील’ जिल्हाधिकारी ठरले आहेत. तसेच भारतातल्या ’मुक्ताई सेवादल फाऊंडेशन’ या संशोधन, रिसर्च करणार्या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये काकडे यांनी केलेले सांगितलेले १५ प्रयोग देशासाठी वापरण्यात यावेत अशा सूचना केल्या आहेत. काकडे यांच्या कामाचा आदर्श राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी घ्यावा असाच आहे.
काकडे यांनी सांगलीमध्ये केलेल्या प्रयोगाची दाखल सातासमुद्रापार घेतली गेल्याने अवघ्या जगाचे लक्ष सांगलीवर गेले आहे. वंचित, कामगार, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी यांच्यासह विविध घटकांच्या विकासाच्या आड येणार्या अडचणी काकडे यांनी संशोधनाच्या माध्यमातून अगोदर शोधल्या आणि पुन्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला.
काकडे यांनी नांदेड जिल्हा परिषद सोईओ असताना महिलांचे आरोग्य, वाचनसंस्कृती, कॉपी मुक्त अभियान हे सर्व पॅटर्न राज्य सरकारने राज्यभर राबविले. पुण्यात सिडकोला चिफ ऑफिसर असताना गरिबांसाठी घरे हा राज्यासाठी विकसित केलेला प्रयोग त्यांचा होता. पुण्यात ’सारथी’ चे एम डी असताना दोन लाख बहुजनांच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यातले दीड हजारपेक्षा जास्त आयपीएस आणि आयएएस झाले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे सांगलीतील पंधरा नाविण्यपूर्ण उपक्रम रिमांड होम व अनाथ आश्रमातील मुलांची सर्वांगीण प्रगती त्यांना ’स्किलिंग’ चे धडे देऊन पायावर उभे केले. एड्सग्रस्त मुलांसाठी राबवलेला संवेदनशील प्रयोग, त्यांचे विवाह घडवून रोजगार दिले. घरची लक्ष्मी आली सातबार्यावर उपक्रमातून महिलांना मालकीहक्काची ओळख दिली.
घरेलू कामगार महिलांसाठी विशेष आरोग्य मोहीम हजारो महिलांवर उपचार. देहविक्री करणार्या महिलांचा सन्मान व पुनर्वसनाचा मानवी दृष्टिकोनातून केलेला प्रयत्न, मुलींसाठी कराटे व आत्मसंरक्षण प्रशिक्षण २० हजार मुलींचा सहभाग. दिव्यांगांसाठी सेवा व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व्यापक अभियान, त्यांच्या रोजगारासाठी पुढाकार. अवयवदान चळवळीला चालना देत शेकडो जणांचे अवयव दान करण्यासाठी पुढाकार घेतला.
तीन स्पॉट, तीन झाडे सर्व नगरपालिकेत खेळ, आरोग्यासाठी पुढाकार, माझे झाड या पर्यावरणपूरक संकल्पनेची अंमलबजावणी. शेतीचे छोटे रस्ते मुख्य रस्त्याला जोडले, कृषी क्षेत्रातील वेगळे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतातून माल थेट परदेशी बाजारात. दस्तऐवज सुलभीकरणाचा उपक्रम. ’जिल्हाधिकारी यांचा दरवाजा उघडा’ या लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना. मिरजेच्या कलेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुढाकार. भविष्यकालीन सांगली अंतर्गत रुरल टुरिझम संकल्पना राबवली. शेकडो शाळा-कॉलेजमध्ये जाऊन केलेली ’मी जबाबदार नागरिक बनणार’ या विषयावर व्याख्याने दिले.











