धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असुन भाजपने अध्यक्ष पदासाठी अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव पुढे केले आहे. भाजपच्या या नावाला सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने घराणेशाहीचा आरोप करीत विरोध केला आहे मात्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली असुन त्यांचं काम ओहळ, त्या कर्तृत्ववान आहेत. पाटील यांनी सहपरिवार तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांनी पत्रकार यांच्याशी संवाद साधला.
घराणेशाहीचा आरोप करताना तो उमेदवार कर्तृत्ववान आहे की नाही हे पण पाहावे लागेल, अर्चना पाटील ह्या पुर्वीपासून राजकारणात आहेत त्या 2 वेळेस निवडून आल्या आहेत त्यांना कामाचा अनुभव आहे. अश्या वेळेला केवळ त्या राजकीय घरातल्या आहेत म्हणुन त्यांना विरोध करता येणार नाही, ते चुकीचे ठरेल. तसे पाहिले तर मग घराणेशाहीचा आरोप महाराष्ट्रात मोठ मोठ्या नावाना करता येईल, मी काही त्याच्यावर बोलणार नाही असे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
अर्चना पाटील ह्या यापुर्वी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या, त्यांनी 2 वेळेस जिल्हा परिषद निवडणूक जिंकली आहे तर लेडीज क्लब व इतर माध्यमातून महिलांसाठी काम केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक प्रकारे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत ग्रीन सिग्नल दिला आहे.











