धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे पारडे दिवसेंदिवस जड होताना दिसत असुन विक्रमी बहुमत मिळाले आहे. आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे भाजप सोबत गेले असुन त्यांचा व युवा नेते मल्हार पाटील यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे.
धनंजय यांनी चुलते प्रा तानाजीराव सावंत यांच्या विरोधात बंड केले होते, त्या ठिकाणी त्यांना भाजपने पुरस्कृत केले होते, माजी आमदार भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांना पाठबळ दिले होते. भाजपकडे महायुतीसह 37 सदस्य असल्याचा दावा केला आहे. धनंजय सावंत व मल्हार पाटील यांची लोकसभापासुन अत्यंत घनिष्ठ मैत्री आहे. धनंजय सावंत यांना जिल्हा परिषदेत मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे, ते यापुर्वी उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषद सदस्य अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचा अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.












