चोरांच्या उलट्या बोंबा, भाजपला नव्हे घराणेशाहीला विरोध – जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके
धाराशिव – समय सारथी
आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात असुन हिम्मत असेल आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सावंतावर स्वतः बोलावे, इतरांना पुढे करून त्यांच्या नावाने प्रेस नोट काढू नये. स्वतः विरोधात काम करायचे आणि उलट बदनामी करायची. चोराच्या उलट्या बोंबा असे असुन आमचा भाजपला नव्हे तर घराणेशाहीला विरोध असे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके म्हणाले.
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या नावाने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक काढून गंभीर आरोप केल्याचा दावा शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केला. हिम्मत असेल तर त्यांनी स्वतःच्या नावाने प्रेस नोट काढावी, दुसऱ्याला कशाला पुढे करता. स्वतः सावंत यांच्यावर बोला, कार्यकर्ते यांना बळी करू नका असे म्हणत आव्हान दिले.
आम्ही कोणत्याही जागेवर शिवसेना उबाठा सोबत हातमिळवणी केली नाही उलट त्यांनी भुम परंडा येथे उबाठासह सर्व पक्ष एकत्र येत नगर परिषद निवडणुक लढवली. अर्चना पाटील यांना अध्यक्ष करण्याचा हट्टा पुर्ण करण्यासाठी एका माणसाचं मन दुखावल आहे, बाकी कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत असे साळुंके म्हणाले. भुम विधानसभा वेळी राहुल मोटे यांना रसद पुरवली मग ती महायुती सोबत गद्दारी नाही का ? विश्वासघात कोण केला, चोराच्या उलट्या बोंबा अश्या कडक शब्दात टीका केली.
लोकसभा निवडणुकीत तुळजापूर मतदार संघात अर्चना पाटील यांना 55 हजार मते कमी पडली मग तिथे त्यांचे पती राणाजगजीतसिंह पाटील यांनी काम केले नाही का? मागील कोणत्याही निवडणुकीचे एकमेकांना संबंध जोडणे चुकीचे असते. पळसप मधुन नेताजी पाटील यांना उमेदवारी दिली ही कुठली पद्धत ? पक्ष मोडीस काढणार असाल तर शिवसेना शांत बसणार नाही.
आमच्या निवडून आलेल्या सदस्यांना पक्ष श्रेष्टींनी बोलविले तेव्हा आम्ही जाणार, तुम्ही सांगायची काय गरज, आमचे उमेदवार का नेले यांचे उत्तर आधी द्या. एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील तो सर्वाना मान्य असेल असे म्हणाले. सावंत यांचा घराणेशाहीला विरोध असुन त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे. आमचा भाजपला विरोध नाही, आमच्या पक्षाचे धोरण ठरवणारे हे कोन, आम्हाला सल्ले देऊ नका असे साळुंके म्हणाले.
आमचा घराणेशाहीला विरोध होता, हे वयक्तिक मत होते. भाजपचा कोणीही अध्यक्ष करा, सामान्य कार्यकर्तेला न्याय मिळू द्या, पक्षश्रेष्टीनी सांगितले तर ते मान्य करू, आमचे सदस्य नेण्याचे कारण काय ? असा सवाल साळुंके यांनी केला.











