कळंब – समय सारथी
ईटकूर जिल्हा परिषद गटातील जनतेने शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीच्या कामावर विश्वास ठेवत आम्हाला विजयी केले आहे. हा विजय केवळ आमचा नसून प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचा आहे. पण काही ‘स्वयंघोषित’ नेते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी पक्षाच्या विरोधात गरळ ओकत आहेत, त्यांना आमचा स्पष्ट इशारा आहे असे म्हणत जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे यांनी फेसबुक लाईव्ह केले आहे.
या लोकांनी लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकेत कुणाचे काम केले? उबाठा गटाशी हातमिळवणी करून शिवसेनेच्या उमेदवारांना हरवण्याचे षडयंत्र कोणी रचले? हे अवघ्या जिल्ह्याला ठाऊक आहेच. ज्यांनी पक्षाच्या विरोधात जाणीवपूर्वक काम केले, त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये! आमचे नेते एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी आणि जिल्हाप्रमुख अजित दादा पिंगळे यांचे आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य आहेत.
शिवसेना उमेदवारांशी गद्दारी करणाऱ्यांनी स्वतःची औकात ओळखून बोलावे. महायुतीच्या विरोधात सुपारी घेऊन चिखलफेक करण्यापेक्षा पक्षवाढीसाठी काहीतरी ठोस काम करा, अन्यथा धाराशिव जिल्ह्यातील जनताच तुम्हाला तुमची जागा आणि औकात दाखवून देईल असे अनंत लंगडे म्हणाले.












