पालकमंत्री सरनाईक, आमदार सावंत, गायकवाड, चौगुले ठरले शिल्पकार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेवर शिवसेना भाजप राष्ट्रवादी अप गटाचे वर्चस्व दिसुन आले. धाराशिव जिल्ह्यात भुम परंडा वाशी यां मतदार संघात शिवसेना व भाजप आमनेसामने असली तरी अधिकांश ठिकाणी महायुती होती. शिवसेना शिंदे गटाने 55 पैकी 23 जागा लढवील्या त्यात 15 जागा निवडणुण आल्याने शिवसेनेचा विजयाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक 65 टक्के इतका राहिला. त्या खालोखाल भाजप, राष्ट्रवादी व इतर पक्षांचा राहिला.
शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सभा घेतली त्यानंतर जिल्यातील शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण राहिले. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा, लोहारा, कळंब धाराशिव येथे नियोजन करीत यश मिळवले तर भुम परंडा वाशी येथे आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी एकाकी खिंड लढवीत विक्रमी विजयश्री खेचून आणला व शिवसेनेच्या तुल्यबळ जागा निवडून आणल्या. त्यामुळे हे सगळे विजयाचे शिल्पकार ठरले.
शिवसेना शिंदे गटाने 23 पैकी 15 विजयी जागा म्हणजे 65 टक्के, भाजप 41 पैकी 19 जागा म्हणजे 46 टक्के, राष्ट्रवादी अजित पवार गट 16 पैकी 6 म्हणजे 37.5 टक्के, काँग्रेस 16 पैकी 3 जागा म्हणजे 18.75 टक्के, शिवसेना उबाठा गटाने सर्वाधिज 44 जागावर उमेदवार उभे केले मात्र त्यानंतर केवळ 7 जागा जिंकता असल्या म्हणजे 15.90 टक्के यश मिळाले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 12 जिल्हा परिषद जागावर उमेदवार दिले मात्र एकही जागा जिंकता आली नाही.
55 जागा पैकी 19 जागावर भाजपने विजय मिळवीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला 15 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाला 7, 3 काँग्रेस, 4 अपक्ष, 1 समाजवादी पार्टीला मिळाली आहे.महायुतीला 40 जागा मिळाल्या असुन स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीला 10 व अपक्ष 4 व 1 समाजवादी पार्टी असे संख्याबळ आहे.
शिवसेनेला भाजप खालोखाल 15 जागा मिळाल्याने सेनेने अध्यक्षपदावर दावा केला असुन बार्गेनिंग पॉवर व सत्तेतील दावा आणखी मजबूत झाला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती या6 जागावर शिवसेना दावा करू शकते. काही अपक्ष निवडून आलेले उमेदवार शिवसेनेचे असुन काही जन संपर्कात असल्याने सेनेचे पारडे आणखी जड मानले जात आहे. शिवसेना आता गेम चेंजर व निर्णायक भूमिकेत असल्याने शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण आहे. अश्या स्तिथीत शिवसेनेच्या पदरात काय पडते ते पहावे लागेल.












