धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप, शिवसेना महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील यांनी विजयी उमेदवार यांचे अभिनंदन केले. पृथ्वीराज यांनी आजच्या ऐतिहासिक विजयाचा वृत्तांत डॉ पाटील यांना दिला, याबाबतचा एक व्हिडिओ आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. निवडणुकीत अर्चना पाटील यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत आमदार राणाजगजीतसिंह पाटील व युवा नेते मल्हार पाटील यांच्यासह त्यांच्या टीमने केलेल्या बांधणी व नेतृत्व गुणाचे कौतुक केले.










