धाराशिव – समय सारथी
शिवसेना पक्षाच्या युवासेनाचे बीड व लातुर निरीक्षक अविनाश खापे यांचे पक्षातून केलेले निलंबन स्थगित करण्यात आले असुन तसे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिले आहे. खापे यांनी याबाबतची माहिती दिली, त्यानंतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी यांचे स्वागत करीत जल्लोष केला.
शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आपल्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाईला स्थगिती देण्यात येत आहे.आपण ज्या पदावर होते, त्या पदावर कार्यरत आहात याची नोंद घ्यावी, असे पत्रात म्हणटले आहे. शिवसैनिक यांच्या संतप्त प्रतिक्रियानंतर अवघ्या 2 दिवसात निलंबन मागे घेण्यात आले.
पक्ष विरोधी काम व प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत खापे यांचे युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी निलंबन केले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे एबी फॉर्म व जागा वाटप यावर खापे यांनी संपर्क प्रमुख राजन साळवी यांना जाब विचारत शिवसैनिकांची भुमिका मांडली होती व त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली होती. पक्ष शिस्त मोडली व साळवी यांचा अपमान केला म्हणुन निलंबन केले मात्र ते रद्द केले आहे.
अन्याय सहन करणारा शिवसैनिक असू शकत नाही. हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द.. आपल्यावर अन्याय होतो तर म्हणूनच पक्षातील नेत्यांनी बंड केले त्यात काय चुकले. इतर लोकांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार का असा सवाल ऍड अजित खोत यांनी उपस्थितीत केला होता.
एबी फॉर्म अजित पिंगळे यांच्या हातात विश्वास ठेवून दिले मात्र त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचे वाटप केले. त्यांनी शिवसैनिक यांना विश्वासात न घेता ते दिले हे योग्य नाही अशी भुमिका पालकमंत्री सरनाईक व साळवी यांनी स्पष्ट केली होती.











