धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटात रत्नमाला पिंपळे ह्या आम आदमी पार्टीकडुन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिक्षण, वृक्ष लागवड, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यासाहा शेतकरी, ऊस दर आंदोलनासह त्यांनी सहभाग घेतला असुन जनसंपर्काच्या जोरावर त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
तेर जिल्हा परिषद गटामध्ये रत्नमाला तानाजी पिंपळे ह्या आम आदमी पार्टीकडून उभ्या आहेत त्यांनी मागील 15 वर्षांपासून तेर आणि परिसरामध्ये लहान मुलांसाठी शैक्षणिक संकुल सुरू करून अविरत सेवा दिलेले आहे.त्याचप्रमाणे त्यांचे पती तानाजी पिंपळे हे मागील पाच ते सात वर्षांपासून तेर परिसरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी आहेत.
जवळपास 1 हजार ते 2 हजार मोठे वृक्ष लावून वाचवले आहेत आहेत.स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवले आहे.श्री संत गोरोबा काकांच्या परिसरामध्ये घाट स्वच्छता मोहीम राबवून दीपोत्सव मागील पाच वर्षापासून सुरू आहे. श्री संत गोरोबाकाकांच्या यात्रेत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सलग सात वर्षापासून थंड व स्वच्छ पाण्याची व्यवस्था केलेले आहे.
गरीब होतकरू मुलीसाठी सायकल वाटप कार्यक्रम, महिलांसाठी महिला मार्गदर्शन मिळावे, बचत गटातील महिलांसाठी वैयक्तिक लाभाच्या वेगवेगळ्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
शेतकऱ्यांची उसे शेतकऱ्यांचे उसाचे बिल काढून देण्यासाठी परिसरातील सर्वच कारखान्यावर आंदोलन केलेले आहे. हंगाम 2026 मध्ये जवळपास सात ते आठ साखर कारखाने आणि गुळ फॅक्टरी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या उसाला 3 हजार रुपये भाव द्यावा म्हणून निवेदन दिले आणि ढोकी चौकात रास्ता रोको आंदोलन केले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक असून त्यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधित समर्थनात एकदा 5 दिवस तर एकदा 4 दिवस आमरण उपोषण केले आहे. 2021-22 मध्ये तेरणा नदीला महापूर आला असता गावातील वेगवेगळ्या दुकानांमधील सामान बाहेर काढून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा राहिला.
विमा अनुदानमध्ये शेतकरी फसवणूक करून लूट केल्याचा पर्दाफाश करून ते पैसे शेतकऱ्याला मिळवून दिले आणि शासनाची फसवणूक काढली. आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके आणि प्रदेश संघटक संग्राम घाडगे, जिल्हाध्यक्ष माकोडे राहुल माकोडे आणि सचिव मुन्ना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असुन आव्हान उभे केले आहे.












