धाराशिव – समय सारथी
राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दौऱ्यावर येत असुन ते 2 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात 4 ठिकाणी प्रचार सभा घेतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी दिली. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता ईट येथे, दुपारी 2 वाजता येणेगुर, 4 वाजता तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, सायंकाळी 6 वाजता ढोकी येथे सभा घेऊन रात्री धाराशिव येथे मुक्काम करतील.











