बारामती – समय सारथी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती येथे लँडिंग दरम्यान कोसळले असुन या अपघातात अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बहीण सुनेत्रा यांचे अजित पवार हे पती होते, ते धाराशिवचे जावई असल्याने डॉ पाटील परिवारासह जिल्ह्यावर शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त होत आहे. धाराशिव जिल्ह्याचे जावई असे ते नेहमी अभिमानाने सांगत, धाराशिवसाठी त्यांचे झुकते माप व कायम प्रेम असे. त्यांच्या अनेक आठवणी आजही धाराशिवकरांच्या मनात कायम आहेत.
ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, अर्चना पाटील, मल्हार पाटील, माजी आमदार राहुल मोटे, जीवनराव गोरे सह त्यांच्या परिवाराने दुःख व्यक्त केले आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक,खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, कैलास पाटील यांच्यासह माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सुजितसिंह ठाकुर, बसवराज पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.
सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे ह्या दिल्ली वरून बारामती येथे निघाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना फोन करून घटनेची माहिती घेत शोक व्यक्त केला. या अपघातात पवारांचे विमान हे पुर्णत जळून खाक झाले असुन यां विमान अपघाताची चौकशी होणार आहे. देशभरातून शोक व श्रद्धांजली व्यक्त होत आहे.
बारामती येथे जिल्हा परिषद प्रचाराच्या सभेसाठी अजित पवार मुंबई वरून बारामती येथे 4-5 जणासोबत जात होते मात्र ते विमान लँडिंग करताना कोसळून शेतात पडले. 6 ज्यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA ने दिली आहे.












