महायुती अधिक घट्ट – लवकर निर्णय घ्या, विरोधी कौल आम्ही जनतेचा आदेश पाळणार, तुम्हाला शुभेच्छा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना शिवसेना पक्षात व महायुतीत येण्याचे खुले निमंत्रण दिले. तुम्हाला कोण म्हणल विरोधी पक्षात रहा, तुम्ही आमच्याकडे या.. आम्हाला जनतेने विरोधी पक्षाची भुमिका बजावा असा कौल दिला आहे त्याप्रमाणे आम्ही काम करीत आहोत असे म्हणत भाजप सेना युतीला शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना महायुतीत येण्याचे निमंत्रण दिले. त्यावर आमदार पाटील म्हणाली जनतेचा तसा आदेश आहे. जनतेचा काय आदेश आहे हे तुम्हाला नगर परिषद निवडणुकीमध्ये कळाले असेल त्यामुळे तुम्ही आता आमच्याकडे या असे म्हणत खुले निमंत्रण दिले. आम्ही आमची विरोधी पक्ष म्हणुन भुमिका बजावत असे उत्तर दिले.
आमच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही ज्या पक्षात होतो त्या पक्षाला मतदार व जनतेने विरोधी पक्षात रहा असा कौल दिला. आम्हाला विरोधी पक्षाची भुमिका बजावा असे जनतेने सांगितले ती आम्ही बजावत आहोत. लोकसभा, विधानसभा अजुन 3 ते साडे तीन वर्ष आहेत असे ओमराजे म्हणाले. त्यावर पालकमंत्री म्हणाले की त्याआधी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आहेत त्यामुळे विचार करा व काय तो निर्णय लवकर घ्या असे सरनाईक म्हणाले. त्यावर आमदार कैलास पाटील. म्हणाले की, जनतेने आम्हाला जो आदेश दिला आहे त्याप्रमाणे काम करणार आहोत, त्यावर पालकमंत्री ठीक आहे ठीक आहे असे म्हणाले.
मतदान कोणाला केले हे कोणाला कधीच कळत नाही, लोकांची मागणी आल्यावर आम्ही काम मागणी करतो, विरोधी पक्षात असलो म्हणजे काम करू नये असे नाही असे ओमराजे अधिकाऱ्यांना म्हणाल्या नंतर पालकमंत्री म्हणाले की तुम्हाला कोण विरोधी पक्षात रहा म्हणतंय, तुम्ही आमच्या सोबत सत्तेत या.
कुठल्याही कामाला स्थगिती देऊ नका, कने अडवू नका, तुमचं आमचं चालु द्या असे ओमराजे निंबाळकर पालकमंत्री यांना म्हणाले. स्थगिती दिल्यामुळे 2 वर्ष कामे प्रलंबित पडली, लोकांना त्रास सहान करावा लागला. त्यावर पालकमंत्री म्हणाले की नगर परिषद निवडणुकामुळे शिवसेना भाजप युती अधिक घट्ट झाली आहे, त्यामुळे स्थगिती मिळणार नाही असा विश्वास व्यक्त केला त्याबर खासदार व आमदार यांनी तुमच्या महायुती शुभेच्छा असे म्हणत शुभेच्छा दिल्या.












