विजय पचवा,जशाच तसे उत्तर देऊ – मल्हार पाटीलांवर शिवसेनेची टीका
धाराशिव – समय सारथी
सत्तेचा माज कशाला म्हणतात हे जर बघायचे असेल तर मल्हार पाटील उर्फ मल्लू नेरुळकर उर्फ छोटा डॉन यांचे कालचे भाषण बघावे लागेल. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वारसदार व केवळ आमदाराचा सुपुत्र मुलगा असणे एव्हडेच यांचे कर्तृत्व आहे. खासदार ओमराजे यांच्यावर बोलावे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे म्हणत शिवसेना उबाठा गटाने मल्हार पाटील यांच्यावर टीका केली आहे.
मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली होती त्याला शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते जगदीश पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ओम्या, शेमडं पोरं .. तुझी औकात काय ? दिल्लीत काय दिवे लावले हे लोकांना माहिती आहे. जनतेसाठी पुढच्या 50 पिढ्या आम्ही असणार आहोत असे मल्हार पाटील तुळजापूर येथील भाषणात म्हणाले होते.
काय तर म्हणे तर पुढच्या 50 पिढ्या इथे राज्य करणार आहेत. 40 वर्ष जिल्हा लुटून खाल्ला इतकं पुरेसे नाही का ? धाराशिव देशातील मागास जिल्हा बनवला हे पुरेसे नाही का? फुट पाडून मतांचे ध्रुवीकरण करून निवडणुका लढलात. आमच्या नेत्यांनी तो जनतेचा कौल म्हणुन तो मान्य केला व पचवला मात्र तुम्हाला विजय पचवता आला नाही, तुम्हाला सत्तेचा माज आलेला आहे अशी टीका पाटील यांनी केली.
नगर परिषद निवडणुका ह्या मॅटवरच्या कुस्त्या होत्या जिल्हा परिषद निवडणुका ह्या माती मधल्या कुस्त्या आहेत, त्यासाठी पैलवान हा मातीमधला लागतो. तुम्ही व तुमच्या पक्षाला मातीची ऍलर्जी आहे. तुम्हाला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता येत नाही, मातीमध्ये मिसळता येत नाही. शेतकरी यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणुन खर्च दुप्पट केला. शेतकरी याचे पीक बाजारात यायचे म्हण्टले तर आयत करून भाव कमी करायचे असे म्हणाले.
तुमच्या पेक्षा जास्त खालच्या पातळीवर शिवसेनिकांना बोलता येते पण आम्हाला आमच्या नेत्यांनी मर्यादा घातल्या आहेत. राणा दादा आपले हे संस्कार रस्त्यावर दिसत आहेत, हे संस्कार घरात ठेवा स्वतः सुसंस्कृतपणाचा आव आणुन स्वतःच्या मुलाला बोलायला लावावे ही खरेतर धाराशिवच्या राजकारणात दुर्दैवी घटना आहे. हे कुठेतरी थांबवा याला आवर घाला अन्यथा शिवसैनिक त्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवतो असे म्हणत इशारा दिला आहे.












