धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 ब मधील भाजपचे उमेदवार तथा शहराध्यक्ष अमित दिलीपराव शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमुर्ती ( Chief Justic Of India ) सुर्यकांत व न्यायमुर्ती जॉयमला बग्गाची या 2 जणांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी त्यांनी याचिका फेटाळून लावली.
अमित दिलीपराव शिंदे यांच्या बाजुने सलग 4 निकाल वेगवेगळ्या कोर्टात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा व सत्र न्यायालय, छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला होता त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील शिंदे यांच्या बाजुने निकाल दिला. शिंदे यांचा विजय झाला असुन त्यांच्या समर्थकात जल्लोषचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे यांच्या बाजुने ऍड सुधांशु चौधरी व ऍड कैलास औताडे यांनी सक्षमपणे बाजु मांडली. उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ आर एन धोरडे, एस एस दुधाने, ऍड प्रतीक देवळे यांनी काम पाहिले.
20 डिसेंबर रोजी मतदान होणार असुन त्या निवडणुकीतही अमित शिंदे यांचा विजय होईल असा विश्वास मतदार व समर्थकातून व्यक्त केला जात आहे. शेवटी सत्याचा विजय झाला.. सत्यमेव जयते असे म्हणत शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत सर्वांचे आभार मानले.
शिंदे यांच्या उमेदवारी विरोधात धाराशिव कोर्टात प्रकरण दाखल करण्यात आले होते त्यात कोर्टाने निकाल दिला असुन शिंदे यांनी न्यायालयीन लढाई जिंकली आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांचा निकाल जिल्हा कोर्टाने कायम ठेवला. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी सरकारच्या वतीने बाजु मांडत युक्तिवाद सादर केला होता तर शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ऍड प्रताप देवळे, ऍड प्रतीक देवळे, ऍड महादेव यादव यांनी सक्षमपणे बाजु मांडली.












