Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

षडयंत्र, पेड व फेक न्यूज कांड – बोगस एक्सिट पोल व्हिडिओचे प्रकरण, आमदार पाटील पिता पुत्रावर शिवसेनेचे गंभीर आरोप 

समय सारथी by समय सारथी
December 13, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
916
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत एका न्यूज चॅनेल सारखा व्हिडिओ तयार करून बोगस एक्सिट पोल प्रसारित केल्याप्रकरणी ‘धाराशिव 2.0’ (Dharashiv 2.0) सह इतर 2 इन्स्टाग्राम पेजेसच्या ऍडमिन्स विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी या मागचा षडयंत्रकारी समोर आणावा. आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा या प्रकरणात हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. व्हिडीओ कांड असुन यात कारवाई करू नये यासाठी अधिकारी यांच्यावर दबाव होता, यात अधिकारी यांनी वेळकाढुपणा केला त्यामुळे त्याची चौकशी करावी अशी मागणी केली. 

एक्सिट पोल व्हिडिओबाबत तात्काळ तक्रार देण्यात आली मात्र गुन्हा नोंद करायला इतके दिवस का लागले, हा व्हिडिओ कोणी बनवला, त्या मागचा हेतू काय ? कोणाच्या नंबरवरून पाठवला? या मागचा मास्टर माईंड कोण ? हे सगळे एक षडयंत्र असुन त्याची पोलखोल होणे व सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे अशी मागणी राकेश सूर्यवंशी, सोमनाथ गुरव, रवी वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

पेड व फेक न्यूजचा हा प्रकार असुन मतदानावर याचा फरक पडावा यासाठी हे केले आहे. या ऍडमिनचे बँक खाते, राणाजगजीतसिंह पाटील व मल्हार पाटील यांचा तो ऍडमिन कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आहे. त्याला अटक करून मोबाईल, लॅपटॉप जप्त करावा, फेक व पेड न्यूजचा तपास करावा. कारवाई नाही झाली तर राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.

2004 च्या निवडणूक वेळी सुद्धा पवनराजे निंबाळकर यांचा डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा असे वृत्त छापून आणले, त्यावेळी 484 मतांनी पराभव झाला. फेक न्यूज हा रडीचा डाव खेळण्याचा विरोधकांचा जुना डाव आहे. हे तिन्ही पेज व इन्स्टाग्राम बंद करावे अशी शिवसेनेने मागणी केली आहे. 

भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 223,337,353 तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 126 (A) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) 2000 चे कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शकील शेख करत आहेत.

धाराशिव नगरपरिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान नियोजित होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानापूर्वीच्या 48 तासांत कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल किंवा जनमत चाचण्या प्रसिद्ध करण्यास बंदी असते. मात्र, 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास ‘धाराशिव 2.0.’ (Dharashiv 2.0), ‘जिल्हा धाराशिव’ (jilha dharashiv) आणि ‘ऑल अबाऊट धाराशिव’ all about dharashiv) या सोशल मीडिया पेजेसवरून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.

या व्हिडिओमध्ये एका बनावट टीव्ही चॅनेलचा वापर करून भाजपच्या उमेदवार सौ. नेहा काकडे या विजयी होत असल्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सौ. परवीन खलिफा कुरेशी या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे भासवण्यात आले होते. 

युवासेना तालुकाप्रमुख राकेश हनुमंत सूर्यवंशी आणि गोविंद कोळगे यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मीडिया सर्व्हेलन्स कक्षाचे सनियंत्रण अधिकारी तथा पालिकेचे उपमुख्याधिकारी विश्वंभर वासुदेवराव सोनखेडकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  

Previous Post

3 आरोपींचा युक्तिवाद संपला – कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड, 17 डिसेंबरला पुढील सुनावणी 

Next Post

ड्रग्ज – हाच का झिरो टॉलरन्स ? लक्षवेधी उत्तर लीकवर कारवाई काय – अग्रवाल मोकाट

Related Posts

महाराष्ट्र

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल – सांगली जिल्ह्यात राबवलेल्या पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

February 21, 2026
महाराष्ट्र

फिलगुडी शॉपचे लोकार्पण – श्रीसिद्धीविनायक परिवाराचे नवे पाऊल

February 20, 2026
महाराष्ट्र

अमिषाला बळी पडणार नाही – आम्ही महायुती सोबत, सत्तेचे समीकरण, राष्ट्रवादीची भुमिका

February 19, 2026
महाराष्ट्र

शासन निधीत अपहार, गुन्हा नोंद – काम न करता लाटले 7 लाख, ठेकेदार व अधिकारी सहभागी

February 19, 2026
महाराष्ट्र

पाठराखण – अर्चना पाटीलांचं काम पहा, त्या कर्तृत्ववान.. घराणेशाही सगळीकडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा टोला

February 19, 2026
महाराष्ट्र

उबाठा गटाला मोठा धक्का बसणार – भुम तालुक्यात नाराजीचा सुर, निर्णयाच्या तयारीत

February 18, 2026
Next Post

ड्रग्ज - हाच का झिरो टॉलरन्स ? लक्षवेधी उत्तर लीकवर कारवाई काय - अग्रवाल मोकाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल – सांगली जिल्ह्यात राबवलेल्या पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

February 21, 2026

फिलगुडी शॉपचे लोकार्पण – श्रीसिद्धीविनायक परिवाराचे नवे पाऊल

February 20, 2026

अमिषाला बळी पडणार नाही – आम्ही महायुती सोबत, सत्तेचे समीकरण, राष्ट्रवादीची भुमिका

February 19, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp