धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा मतपत्रिकेवरील क्रम बदलला असल्याचे समोर आले असुन राष्ट्रवादी शरद पवार गटाने यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी यांच्या दबावाखाली हे करण्यात आले असुन राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण नगर परिषद निवडणुक स्थगित करण्यासाठी आयोगाकडे न्यायालयात जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी दिली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन खलील कुरेशी यांचे नाव पुर्वी मतपत्रिकेवर 1 नंबर वर होते मात्र आता ते 2 नंबरवर गेले आहे. भाजप उमेदवार नेहा राहूल काकडे यांचे नाव 3 नंबर वर होते मात्र नवीन बदलानुसार 1 नंबरवर केले आहे. या सर्व प्रकाराला राष्ट्रवादीचा विरोध आहे.
नवीन बदलानुसार मतपत्रिकेवर 1 नंबरला नेहा राहुल काकडे, 2 वर परवीन खलील कुरेशी, 3 वर संगीता सोमनाथ गुरव, 4 नंबरवर मोमीन नाजिया युसूफ, 5 नंबरवर सुरेखा नामदेव वाघमारे, 6 नंबरवर मंजुषा विशाल साखरे यांचे नाव आहे तर 7 नंबरवर नोटा आहे.












