Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

आज सुनावणी – 140 कोटी रस्ते निविदा प्रकरण उच्च न्यायालयात, आमदार राणाजगजीतसिंह पाटलांचा ‘लाडका ठेकेदार’ कोर्टात – हे पाप कोणाचे ? 

समय सारथी by समय सारथी
November 28, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
465
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेश स्थगितीचा मुद्दा छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात गेला असुन त्यातील याचिकेवर आज 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांचे ‘लाडके ठेकेदार’ डी सी अजमेरा यांना काम मिळावे यासाठी राजकीय शक्ती व कायदेशीर युक्ती पणाला लावली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कायदेशीर अधिकार, कार्यक्षेत्र, कायदा व नियमांचा कोर्टात ‘किस’ पडणार असुन सरकारच्या कोर्टातील भुमिकेकडे व सुनावणीकडे लक्ष आहे. याचिकेत पालकमंत्री सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुका सुरु असल्याने 140 कोटी रुपयांच्या मुद्यावर पालकमंत्री व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यातील राजकीय वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दरबारी’ विकासाच्या नावावर तूर्तास शांत झाला आहे. ठेकेदार अजमेरा यांना 15 टक्के जादा दराने काम मंजुर झाले होते, त्यात सरकारचे अतिरिक्त 22 कोटी जाणार होते. हा 22 कोटी रुपयांचा ‘मलिदा’ ठेकेदाराला देण्याच्या नादात या कामांना उशीर झाला, हे सत्य आहे. धाराशिवकर गेली वर्षभरापासुन खड्डे व खराब रस्त्याने हैराण असुन एका तरुणांचा जीव गेला. ठेकेदाराला कोट्याधीश करण्याच्या नादात हे ‘पाप’ कोणाचे असाही सवाल केला जात आहे.

जिल्हाप्रमुख सुरज साळुंके व माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांची तक्रार

स्पर्धा होऊन सरकारचे करोडो रुपये वाचवण्यासाठी पुन्हा निविदा काढावी अशी पालकमंत्री यांची भुमिका आहे. बीड कॅपॅसिटी व बीड व्हॅलिडिटी या मुद्यावर पालकमंत्री यांनी 2 वेळेस लेखी तक्रार केली आहे. पुन्हा निविदेच्या मुद्यावरून पालकमंत्री व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात उघड वाद सर्वश्रुत आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी याबाबत लेखी तक्रार केली असुन त्यावर काय झाले हे गुलदस्त्यात आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

प्रधान सचिव, नगर परिषद संचनालय, राज्य स्तरीय समितीचे चेअरमन व नगर परिषद मुख्याधिकारी यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबर पर्यंत प्रतिवादी यांना त्यांचे लेखी म्हणणे/प्रतिज्ञापत्र सादर करायचे होते. ऍड प्रज्ञा ताई तळेकर ह्या ठेकेदार यांची बाजु मांडत आहेत. नगर परिषद निवडणुकीत जादा 15 टक्केरुपी करोडो रुपये कोणाच्या घशात जाणार होते? स्वार्थ कोणाचा? जनता का भरडली याचा जनतेच्या दरबारात ‘हिशोब’ होणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्त्थान महाभियान योजनेअंतर्गत 59 डीपी रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रीट रस्ते व नाले बांधणीसाठी ई टेंडर काढले होते. त्यानंतर या कामाचे टेंडर 15 टक्के जादा दराने अजमेरा यांना मिळाले मात्र निविदा दरापेक्षा जास्ती दराने टेंडर असल्याने 22 कोटींचे नुकसान होणार होते त्यामुळे सरकारने आहे त्या निविदा दराने काम करावे असे मुख्याधिकारी यांना सांगितले, ठेकेदार सहमत नसल्यास नव्याने निविदा काढावी असे सांगितले, त्यानंतर अजमेरा हे निविदा दराने काम करण्यास तयार झाले.

अजमेरा यांच्या याचिकेत असे नमूद आहे की, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी 26 मे 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खोटी आणि निराधार तक्रार केली. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आणि स्थानिक आमदार यांच्यातील राजकीय मतभेदांमुळे निविदा प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. ठेकेदार यांचे म्हणणे ऐकून न घेता थेट कार्यादेश देऊन नंतर  स्थगिती दिली. 

कामाचा आदेश जारी केल्यानंतरही 28 ऑक्टोबर रोजी धाराशिव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मौखिक सूचनेवरून काम सुरू न करण्यास सांगितले आणि त्याच दिवशी मंत्र्यांनी संबंधित अधिकारीमार्फत कामावर स्थगिती दिल्याचे कळवले. मंत्र्यांना स्थगिती देण्याचा अधिकार आहे का ? ते त्यांच्या कायदेशीर अधिकार क्षेत्रात येते का ? यासह अन्य बाबी मांडल्या आहेत. कामाचा आदेश देण्यात आला, त्यानंतर आवश्यक संसाधने, यंत्रसामग्री आणि उपकरणांची व्यवस्था केली असे अजमेरा यांनी याचिकेत म्हणटले आहे. 

Previous Post

निवडणुक स्थगित – राज्य निवडणुक आयोगाचे आदेश, धाराशिव नगर परिषदेबाबत आदेश, या जागांची निवडणुक स्थगित

Next Post

आरोग्याच्या विषयात तरी राजकारण सोडा, कॅथ लॅबचे काम रखडले, रुग्णांची हेळसांड – जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी कामाच्या स्थगितीचा फटका 

Related Posts

महाराष्ट्र

गुंतवणूक परिषद – 37 उद्योग, 7 हजार 534 कोटींचे करार – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

August 25, 2026
महाराष्ट्र

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026
महाराष्ट्र

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
महाराष्ट्र

आमरण उपोषण, 3 दिवसांची मुदत – तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा, नगराध्यक्ष विनोद गंगणे व शिष्टमंडळ

August 24, 2026
महाराष्ट्र

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026
Next Post

आरोग्याच्या विषयात तरी राजकारण सोडा, कॅथ लॅबचे काम रखडले, रुग्णांची हेळसांड - जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी कामाच्या स्थगितीचा फटका 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

गुंतवणूक परिषद – 37 उद्योग, 7 हजार 534 कोटींचे करार – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

August 25, 2026

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp