Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

बायोमायनिंग प्रकल्प घोटाळा – थर्ड पार्टी ऑडिट होईना, दीड वर्षांपासुन अहवाल येईना – धाराशिव नगर परिषद

समय सारथी by समय सारथी
November 24, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
70
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव नगर परिषदे अंतर्गत झालेल्या बायोमायनिंग प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी त्रयस्थ तांत्रिक तपासणी अहवाल अद्याप समोर आलेला नसुन राज्य सरकारने वारंवार पत्र देऊनही थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले नाही. जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटूण गेला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर या संस्थेस हे काम दिले असुन ऑडिटबाबत कोणतीही बाब समोर आली नाही. हा घोटाळा नगर परिषद निवडणुकीत प्रमुख मुद्दा असणार आहे. 

2023 च्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेच्या बायोमायनिंग प्रकरणात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता त्यात उत्तर देतेवेळी या प्रकल्पात तयार झालेला खत नगर परिषदेच्या उद्यानात टाकण्यात आल्याचे उत्तर दिले होते. सद्य स्तिथीत किती उद्याने व केव्हापासुन चालु आहेत याची माहिती विचारली असता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी कार्यालयीन अभिलेखानुसार 2 उद्यानाच्या नोंदी असुन त्याचा सध्या वापर नाही असे लेखी उत्तर दिले. ते चुकीचे असल्याचा धस यांचा आरोप आहे. 

तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे,नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्या काळात ही योजना राबविली असुन करोडो रुपयांचे बिल ठेकेदार यांना देण्यात आले आहे तर तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या काळात काही बिल देण्यात आली आहे. बायोमायनिंग प्रकल्प अंमलबजावणीबाबत कडक शासन निर्देश असतानाही धाराशिव नगर परिषदेने नियमबाह्यरित्या तो राबवीला. बायोमायनिंग न करता करोडो रुपये अधिकारी यांनी ठेकेदार यांच्याशी संगणमत करुन लाटले त्यामुळे सरकारचे नुकसान झाले असा आमदार धस यांचा आरोप आहे. 

12 एप्रिल 2018 च्या अद्यादेश व प्रशासकीय व मान्यता पत्रानुसार या बायोमायनिंग योजनेतून खत निर्मिती करुन ते ‘हरीत महासिटी कंपोस्ट ‘ या नावाने विक्री करुन नगर परिषदेचे उत्पन्न वाढविणे हे या योजनेचे उदिष्ट होते मात्र या प्रकल्पतून नगर परिषदेला 1 रुपया सुद्धा खत विक्रीतून मिळाला नाही हे वास्तव आहे त्यामुळे ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तयार झालेल्या सेंद्रिय खताची सीएफओ मानाकनानुसार व शासकीय प्रयोग शाळेत तपासणी करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही.

नगर परिषदेने पुणे येथील सेव्ह एनव्हायरमेंट कंपनीला तब्बल 2 कोटी 22 लाख रुपये खर्च करुन घनकचऱ्यापासुन खत तयार करण्याचा उपक्रम सर्व्हे नंबर 348 मध्ये राबवीला आहे. जवळपास 52 हजार 440 घन मीटर कचऱ्याचे खत करण्यात आले त्यानंतर ते पालिकेच्या उद्यानात टाकण्यात आले असा नगर परिषदेचा दावा आहे. तत्कालीन स्वच्छता निरीक्षक कांबळे यांनी याची पाहणी करुन पुष्टी केल्याचे कागदपत्रावरून दिसते. प्रत्यक्षात 2 लाख 34 हजार 190 घन मीटर कचरा होता मात्र त्यापैकी केवळ 52 हजार 440 घन मीटर काम केले व उर्वरित 1 लाख 81 हजार 750 घन मीटर कचरा शिल्लक राहिला.

बायोमायनिंग प्रकरणात दोषी अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन रक्कम वसुलीची कारवाई करावी तसेच संबंधित दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करावेत अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी सीओपी पुणे मार्फत ऑडिट करण्याची घोषणा केली मात्र त्यांनी असमर्थता दाखवल्याने छत्रपती संभाजीनगर येथे हे काम देण्यात आले मात्र तिथेही काही झाले नाही. ऑडिट न करण्यामागे मोठे गौडबंगाल असल्याची चर्चा होत आहे. नोडल अधिकारी नेमूनही विशेष काही झाले नाही.

Previous Post

आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करा – धाराशिव नगर परिषदेतील संचिका सापडेना, विशेष लेखापरीक्षण रखडले 

Next Post

स्थगिती सरकार – उद्यान व आठवडी बाजाराच्या करोडो रुपयांच्या कामांना स्थगिती – अन्नात विष ? घाणीचे साम्राज्य, भकासपणा नागरिकांचे हाल – मतदानापुर्वी इथे एकदा जावाचं

Related Posts

महाराष्ट्र

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल – सांगली जिल्ह्यात राबवलेल्या पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

February 21, 2026
महाराष्ट्र

फिलगुडी शॉपचे लोकार्पण – श्रीसिद्धीविनायक परिवाराचे नवे पाऊल

February 20, 2026
महाराष्ट्र

अमिषाला बळी पडणार नाही – आम्ही महायुती सोबत, सत्तेचे समीकरण, राष्ट्रवादीची भुमिका

February 19, 2026
महाराष्ट्र

शासन निधीत अपहार, गुन्हा नोंद – काम न करता लाटले 7 लाख, ठेकेदार व अधिकारी सहभागी

February 19, 2026
महाराष्ट्र

पाठराखण – अर्चना पाटीलांचं काम पहा, त्या कर्तृत्ववान.. घराणेशाही सगळीकडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा टोला

February 19, 2026
महाराष्ट्र

उबाठा गटाला मोठा धक्का बसणार – भुम तालुक्यात नाराजीचा सुर, निर्णयाच्या तयारीत

February 18, 2026
Next Post

स्थगिती सरकार - उद्यान व आठवडी बाजाराच्या करोडो रुपयांच्या कामांना स्थगिती - अन्नात विष ? घाणीचे साम्राज्य, भकासपणा नागरिकांचे हाल - मतदानापुर्वी इथे एकदा जावाचं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल – सांगली जिल्ह्यात राबवलेल्या पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

February 21, 2026

फिलगुडी शॉपचे लोकार्पण – श्रीसिद्धीविनायक परिवाराचे नवे पाऊल

February 20, 2026

अमिषाला बळी पडणार नाही – आम्ही महायुती सोबत, सत्तेचे समीकरण, राष्ट्रवादीची भुमिका

February 19, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp