आमदार निधीतुन इंजेक्शन व साहित्य खरेदी करा –
राणाजगजितसिंह पाटील यांचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना काळात नागरिकांची व रुग्णाची सोय व्हावी यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयास आमदार निधीतून १ हजार रेमडीसीवीर इंजेक्शन , ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व बायपॅप मशीन खरेदी करण्याचे पत्र भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहे.
आमदारांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात १००० इंजेक्शन, सिव्हिल रुग्णालय व तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रत्येकी ३ लक्ष रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व बायपॅप मशीन खरेदी करण्याचे पत्र आमदार पाटील यांनी दिले असून अंदाजपत्रक मागवून तात्काळ ही खरेदी करावी अशी सुचना आमदार पाटील यांनी दिले आहे.