थोडासा दिलासा – कोरोनाचे आज 477 नवीन रुग्ण तर 16 मृत्यू
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आजचा वार घातक वार ठरला आज कोरोनाने 16 जणांचा बळी घेतला असला तरी कोरोना रुग्णाची संख्या थोडीफार कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज कोरोनाचे नवीन 477 रुग्ण सापडले व 16 जणांचा मृत्यू झाला तर 360 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सक्रिय रुग्णाची संख्या 5 हजार 863 झाली आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर करत आहेत.
कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 401 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 76 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज 16 रुग्णांचा मृत्यू झाला
असून *कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 725 झाली आहे*.
उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 243 रुग्ण सापडले तर तुळजापूर 38, उमरगा तालुक्यात 47 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5 हजार 863 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यामुळे रुग्णालयात रुग्णाची गर्दी झाली आहे.उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
*उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 88 हजार 947 नमुने तपासले त्यापैकी 29 हजार 554 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 22.64 टक्के आहे. जिल्ह्यात 22 हजार 966 रुग्ण बरे झाले असून 78.63 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 725 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.34 टक्के मृत्यू दर आहे*.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 243 रुग्ण , तुळजापूर 38, उमरगा 47, लोहारा 26, कळंब 47 , वाशी 54, भूम 17 व परंडा तालुक्यात 5 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा –
दिनांक – रुग्ण – मृत्यू – उस्मानाबाद तालुका
1 मार्च – 09 रुग्ण – 00 मृत्यू
2 मार्च – 40 रुग्ण – 01 मृत्यू
3 मार्च – 16 रुग्ण – 00 मृत्यू
4 मार्च – 45 रुग्ण – 02 मृत्यू
5 मार्च – 26 रुग्ण – 00 मृत्यू
6 मार्च – 30 रुग्ण – 00 मृत्यू
7 मार्च – 49 रुग्ण – 00 मृत्यू
8 मार्च – 16 रुग्ण – 01 मृत्यू
9 मार्च – 38 रुग्ण – 01 मृत्यू
10 मार्च – 24 रुग्ण – 00 मृत्यू
11 मार्च – 58 रुग्ण – 00 मृत्यू
12 मार्च – 27 रुग्ण – 01 मृत्यू
13 मार्च – 54 रुग्ण – 00 मृत्यू
14 मार्च – 69 रुग्ण – 00 मृत्यू
15 मार्च – 52 रुग्ण – 00 मृत्यू
16 मार्च – 123 रुग्ण – 01 मृत्यू
17 मार्च – 94 रुग्ण – 00 मृत्यू
18 मार्च – 164 रुग्ण – 00 मृत्यू
19 मार्च – 119 रुग्ण – 00 मृत्यू
20 मार्च – 125 रुग्ण – 00 मृत्यू
21 मार्च – 118 रुग्ण – 01 मृत्यू
22 मार्च – 173 रुग्ण – 00 मृत्यू
23 मार्च – 130 रुग्ण – 00 मृत्यू
24 मार्च – 176 रुग्ण – 00 मृत्यू
25 मार्च – 174 रुग्ण – 00 मृत्यू
26 मार्च – 155 रुग्ण – 02 मृत्यू
27 मार्च – 224 रुग्ण – 00 मृत्यू
28 मार्च – 184 रुग्ण – 00 मृत्यू
29 मार्च – 239 रुग्ण – 00 मृत्यू
30 मार्च – 242 रुग्ण – 00 मृत्यू
31 मार्च – 253 रुग्ण – 02 मृत्यू
1 एप्रिल – 283 रुग्ण – 04 मृत्यू
2 एप्रिल – 292 रुग्ण – 00 मृत्यू
3 एप्रिल – 343 रुग्ण – 02 मृत्यू
4 एप्रिल – 252 रुग्ण – 00 मृत्यू
5 एप्रिल – 423 रुग्ण – 02 मृत्यू
6 एप्रिल – 415 रुग्ण – 08 मृत्यू
7 एप्रिल – 468 रुग्ण – 05 मृत्यू
8 एप्रिल – 489 रुग्ण – 02 मृत्यू
9 एप्रिल – 564 रुग्ण – 00 मृत्यू
10 एप्रिल – 558 रुग्ण – 07 मृत्यू
11 एप्रिल – 573 रुग्ण – 03 मृत्यू
12 एप्रिल – 680 रुग्ण – 05 मृत्यू
13 एप्रिल – 590 रुग्ण – 07 मृत्यू
14 एप्रिल – 613 रुग्ण – 15 मृत्यू
15 एप्रिल – 764 रुग्ण – 10 मृत्यू
16 एप्रिल – 580 रुग्ण – 23 मृत्यू
17 एप्रिल – 653 रुग्ण – 20 मृत्यू
18 एप्रिल – 477 रुग्ण – 16 मृत्यू