Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

सोहळा – ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 2 माजी नगराध्यक्ष भाजपात, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे यश ? टीकेसह समिश्र प्रतिक्रिया

समय सारथी by समय सारथी
November 11, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2k
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम उर्फ मेंबर व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत ‘आदर व सन्मानाने’ प्रवेश केला. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश राजकीय दृष्टया महत्वाचा मानला जात आहे. या दोन्ही प्रवेशामुळे भाजपच्या पक्षीय ताकतीत व वैभवात भर पडल्याचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे ड्रग्ज तस्करीतील गुन्ह्यातील आरोपीना ‘राजाश्रय’ दिल्याची टीका होत आहे. पक्ष प्रवेशाच्या या यशस्वी कामगिरी नंतर आमदार पाटील यांची प्रतिमा जनमाणसात उजाळून निघाली आहे.

– पक्षप्रवेश व्हिडिओ –

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांच्या खास कौशल्याने या मंडळीना भाजप पक्षाचे आचार, विचार, ध्येय, विकासाचे धोरण समजावून सांगत मत आणि मन परिवर्तन केले, त्यानंतर त्यांनी ‘निर्धार’ करीत भाजपचा झेंडा हाती घेतला असे सांगितले जात आहे. या सोहळ्यास भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थितीत होते. कदम यांनी आमदार राणाजगजीतसिंह यांचे या सोहळ्यात ‘चरणस्पर्श’ करीत भावी राजकीय कारकिर्दीसाठी ‘आशीर्वाद’ घेतले, सर्वांची राजकीय व प्रतिमा उंचवण्याची जबाबदारी आमदार पाटील यांच्या खांद्यावर आहे.

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यातील अनेक आरोपीना एकाच छताखाली भाजप पक्षात आणण्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना ‘यश’ आले आहे, एक प्रकारे ते ‘आश्रयदाते’ ठरले आहेत. यापुर्वी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली होती, मात्र ड्रग्ज गुन्ह्यात झालेल्या ‘जेलवारी’ नंतर त्यांना त्यांची चुक ‘उमजली’ असल्याचे बोलले जात आहे. 

ड्रग्ज गुन्ह्यात तस्करीसह इतर गंभीर आरोप असलेले आरोपी हे भाजप पक्षात येत असल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे तर दुसरीकडे झाले गेले विसरून जा.. मन मत परिवर्तन केल्याचे अभिमानाने सांगितले जात आहे. राजकीय अपरिहार्यता व बेरजेच्या राजकारणात सगळे माफ अशीच स्तिथी आहे.

ड्रग्ज हा गंभीर सामाजिक विषय असुन पुढची पिढी वाचवण्यासाठी योग्य ती माहिती देऊन स्वतः पोलखोल केल्याचा दावा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अनेक वेळा पत्रकार परिषदेत केला होता. ड्रग्जला जाहीर विरोध करणारे आमदार आता या पक्षप्रवेशाचे ‘गोडवे’ गाऊन कोणते ‘कारण’ देऊन ‘समर्थन’ करणार हे पाहावे लागेल. 

कदम व कणे यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने काही अटीसह जामीन दिला आहे, ड्रग्ज गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना ‘धाराशिव तहसील’ हद्द बंदी केली आहे. मुळात ड्रग्ज गुन्ह्यात घटना, पुरावे, साक्षीदार हे सगळे ‘तुळजापूर तहसील’ हद्दीतील आहेत, त्यामुळे पोलिस राजकीय दबावाला बळी न पडता तुळजापूर तहसील बंदी बाबत कोर्टात जाणार का ? हे पाहावे लागेल, यासाठी स्थानिक आमदार पाटील पुढाकार घेणार का ? हाही प्रश्न आहे. 

माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांचे जुने वक्तव्य – 

गेल्या 5 वर्षात कोणताही विकास न केल्याचे आरोप कदम यांनी केला होता. कागदावर नुसत्या पोकळ घोषणा झालेल्या आहेत. मी उघड उघड स्वतःच्या पक्षाच्या विद्यमान आमदारावर आरोप करतो आहे. 5 वर्षात आपण खुप मागे आलो आहोत, कागदावर फक्त घोषणाचा पाऊस पडलेला आहे. कोणताही निधी आलेला नाही. त्यासाठी आपल्या टीममधुन कोणीतरी एकाला आमदारकीला उभे राहणे गरजेचे आहे. 

अशी झाली अटक, मिळाला जामीन – 

22 जुन रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर यांना अकलूज सोलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांना पुणे येथून 21 जुलै रोजी अटक होती त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांना 10 ऑक्टोबर रोजी सशर्त जामीन मंजुर केला. कणे व परमेश्वर यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत.

Previous Post

ड्रग्ज तस्करी – मुख्य तस्करासह 2 आरोपी अद्याप फरार, पोलिसांचा शोध सुरु 

Next Post

2 लाखांची लाच घेताना अटक – API सह 2 पोलिस हेडकॉनस्टेबल जाळ्यात – धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई 

Related Posts

महाराष्ट्र

गांजा लागवड – 73 लाखांचा 146 किलो गांजा जप्त – धाराशिव जिल्ह्यात कारवाई

February 16, 2026
महाराष्ट्र

हत्याकांड – खुन प्रकरणात कला केंद्रावरील नर्तिका व इतर चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांचा तपास सुरु

February 16, 2026
महाराष्ट्र

जय पराजय होत असतो, सगळ्यांनी मदत केली, आम्ही एकत्र – चालुक्य यांनी आरोप फेटाळले

February 16, 2026
महाराष्ट्र

बदनामीचे षडयंत्र, हिम्मत असेल तर स्वतः बोला – आमदार पाटील यांना आव्हान

February 16, 2026
महाराष्ट्र

शिवसेनेत घुसखोर, अनेक जन बुजगावणे – दुष्काळी व दळभद्री मानसिकता – अविनाश खापेंचा आरोप

February 16, 2026
महाराष्ट्र

गद्दारांना इशारा ! औकात ओळखुन बोला – सुपारी घेऊन चिखलफेक, काम करा – जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे

February 16, 2026
Next Post

2 लाखांची लाच घेताना अटक - API सह 2 पोलिस हेडकॉनस्टेबल जाळ्यात - धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

गांजा लागवड – 73 लाखांचा 146 किलो गांजा जप्त – धाराशिव जिल्ह्यात कारवाई

February 16, 2026

हत्याकांड – खुन प्रकरणात कला केंद्रावरील नर्तिका व इतर चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांचा तपास सुरु

February 16, 2026

जय पराजय होत असतो, सगळ्यांनी मदत केली, आम्ही एकत्र – चालुक्य यांनी आरोप फेटाळले

February 16, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp