धाराशिव – समय सारथी
भाजपच्या धाराशिव टीमने शिवसेना नेते आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची पुणे येथे कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनमोकळ्या गप्पा व सदिच्छा भेट झाल्याचे भाजप पदाधिकारी सांगत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य व नितीन काळे यांनी सावंत यांची भेट घेतली.
मागील काही गोष्टीमुळे भाजप व शिवसेना या महायुतीतील पक्ष नेतृत्वाचे संबंध दुरावले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह अन्य मुद्यावर मनोमिलन होण्यासाठी ही भेट महत्वाची मानली जाते.
माजी आमदार राहुल मोटे हे अजित पवार गटात आल्याने भुम परंडा वाशी मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भुम परंडा मतदार संघात भाजप व राष्ट्रवादी बैठका सुरु असतानाच सावंत यांची भेट महत्वाची मानली जाते.












