धाराशिव – समय सारथी
धाराशिवकरांनी राजकीय अपप्रवृत्तींची काळजी करू नये. आपल्या अपेक्षांना न्याय मिळवून देणारच अशी पोस्ट भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली आहे. धाराशिव नगर परिषदेच्या 140 कोटी रुपयांचे काम व त्याला फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती यावरून राजकारण तापले आहे. आमदार पाटील. यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या प्रकरणात मौन सोडले आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी 2 वेळेस केलेल्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामास स्थगिती दिल्याचे निर्देश दिले तसे आदेश नगर विकास विभागाने काढले. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे सुद्धा कामाबाबत व निविदा प्रक्रिया बाबत प्रश्न उपस्थितीत करीत आहेत. अजमेरा या ठेकेदार यांना काम द्यावे या हट्टामुळे राणाजगजीतसिंह पाटील हे यात एकटे पडले आहेत.












