Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

अंमलबजावणी – मुख्याधिकारी यांनी अजमेरा ठेकेदाराला दिले स्थगिती व काम सुरु न करण्याचे पत्र

समय सारथी by समय सारथी
October 28, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
930
VIEWS

अर्थकारण – वैयक्तिक लाभाची योजना, मी धाराशिवचा आमदार नाही तरीही निधी आणला, उपकृत भावना 

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या कामाला देण्यात आलेले कार्यारंभ आदेशाला नगर विकास विभागाने स्थगिती दिली आहे. नगर विकास विभागाचे पत्र व खुद्द उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवरील निर्देशानंतर धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी ठेकेदार डी सी अजमेरा यांना स्थगिती दिल्याचे व काम सुरु न करण्याचे पत्र काढले आहे. उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाची मुख्याधिकारी यांनी तात्काळ अंमलबजावणी केली आहे. 

कार्यारंभ आदेश देताना मोठे ‘अर्थकारण’ झाल्याचा आरोप पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केला होता. या कामाची पुन्हा निविदा काढल्यास राज्य सरकार व नगर परिषदेचे काही कोटी रुपये वाचतील अशी पालकमंत्री यांची भुमिका असुन त्यांनी 2 वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार शिंदे यांनी तसे निर्देश सुद्धा दिले आहेत.

पुन्हा निविदा काढल्यास स्पर्धा होईल व निविदा दरापेक्षा कमी दराने ही निविदा जाऊ शकते त्यामुळे काही कोटी वाचतील. अजमेरा ठेकेदार यांना सुरुवातीला 15 टक्के ज्यादा दराने काम मंजुर करण्यात आले होते, त्यामुळे नगर परिषदेचे अंदाजे 22 कोटींचे नुकसान होणार होते मात्र वाढीव निविदा दराने नकार दिल्यावर अजमेरा हे आहे त्या दराने अर्थात 140 कोटीत काम करायला तयार झाले याचा अर्थ नगर परिषदेचे 22 कोटी वाचले. यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन व शिवसेना उबाठा गटाने आमरण उपोषण केले होते. 

नवीन निविदा निघाल्यास सुधारित दारामुळे हे काम 140 कोटी वरून काही कोटी वाढेल मात्र अजमेरा हे आहे त्या 140 दराने काम करण्यास तयार झाले आहेत त्यामुळे 60 कोटी वाचतील असा ‘डंका’ आमदार राणाजगजीतसिंह पाटील पिटत आहेत. मात्र गेल्या 2 वर्षांपासून सुधारित दर झाले नाहीत त्यामुळे आमदार राणा यांचा पैसे वाचवल्याचा दावा फोल ठरत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. जीएसटी दर कमी झाले आहेत त्यामुळे निविदा रक्कम कमी होईल व स्पर्धेमुळे कमी दराने निविदा येऊ शकते, असे आमदार कैलास पाटील यांचे म्हणणे आहे.

वरील 3 मुद्यावर व पालकमंत्री सरनाईक यांनी 2 वेळेस केलेल्या लेखी तक्रारी व त्यातील मुद्दे व भुमिका यावर आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे मुद्देसूद बोलायला तयार नाहीत, पत्रकार यांच्या प्रश्नांना ‘किरकोळ’ समजून राजकीय ‘विषयांतर’ सुरु आहे.

मी धाराशिवचा ‘आमदार’ नाही, मी तुळजापूरचा आमदार आहे मात्र तरी देखील अथक प्रयत्नाने निधी आणला असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील सांगत असुन ‘उपकृत’ भावना व्यक्त करीत जनतेचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत. एरव्ही आमदार पाटील हे धाराशिव कळंब सह अख्या जिल्ह्यातील 4 ही मतदार संघावर किंबहुना शेजारील लातूर सह मराठवाड्यावर ‘अधिराज्य’ गाजवतात. 

‘मित्रा’चे उपाध्यक्ष माध्यमातून आढावा बैठका, निर्णयाच्या प्रेस नोट देत तर कधी फेसबुक लाईव्ह तर भुम परंडा येथे नुकसान आढावा बैठका घेतात मात्र यावेळी पहिल्यांदा त्यांच्या तोंडून धाराशिवचा ‘आमदार’ नसल्याची भावना व्यक्त होणे हे न पटणारे आहे, यातच सर्व काही आले असे खासदार ओमराजे म्हणतात.

अजमेरा हे एकमेव ठेकेदार शहराचा विकास व चांगले काम करू शकतात अशी काहीशी पक्की ‘धारणा’ आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची झाली असुन त्यांना काम द्यावे असा राज’हट्ट’ आहे. त्यांच्यासाठी ही वैयक्तिक लाभाची किंवा स्वार्थाची आर्थिक योजना असू शकते असा आरोप खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.

राणा यांचा यात स्वार्थ आहे, यातील एकही काम इतर ठेकेदार किंवा कार्यकर्ते यांना मिळणार नाही मात्र ते शहराचा, पक्ष कार्यकर्ते, जनतेचा व विकासाचा कळवळा असल्याचे दाखवत अजमेरा यासाठी हट्ट करीत आहेत. त्यांनी इतका कळवळा करून स्वतःला त्रास करून घेऊ नये, धाराशिवचे आमदार त्याला खंबीर आहेत, असा सल्ला ओमराजे यांनी दिला. हा विषय सार्वजनिक असल्याचे दाखवीत त्या आड ते स्वार्थ साधत आहेत, त्यांनी आमने सामने चर्चेची वेळ व ठिकाण सांगावे, त्यांना जमत नसेल तर मी सांगतो असे ओमराजे म्हणाले.

Previous Post

कै पवनराजे निंबाळकर हत्याकांड – डॉ पद्मसिंह पाटील यांना युक्तिवाद सादर करण्यास 7 दिवसांची मुदत, कोर्टाचे आदेश

Next Post

डाव.. ‘वेळ’ व कायदेशीर मुद्याचा ‘खेळ’ – 140 कोटींचे कामात नगर परिषद व ठेकेदारात पत्र’व्यवहार’ – पहा काम सुरु झाल्याचे ‘ते’ स्तब्ध फोटो

Related Posts

महाराष्ट्र

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026
महाराष्ट्र

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
महाराष्ट्र

आमरण उपोषण, 3 दिवसांची मुदत – तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा, नगराध्यक्ष विनोद गंगणे व शिष्टमंडळ

August 24, 2026
महाराष्ट्र

तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी – भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून विमानतळाचीही भेट

August 22, 2026
महाराष्ट्र

आमचं ठरलंय – नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची एक पोस्ट अन चर्चेला उधाण

August 22, 2026
Next Post

डाव.. 'वेळ' व कायदेशीर मुद्याचा 'खेळ' - 140 कोटींचे कामात नगर परिषद व ठेकेदारात पत्र'व्यवहार' - पहा काम सुरु झाल्याचे 'ते' स्तब्ध फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

मल्हार पर्व – धाराशिव पालिकेत धक्का तंत्र – 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर

August 24, 2026

युवा संमेलन – करिअर मार्गदर्शनासह राष्ट्र निर्माणाचा संकल्प – युवा विचार, नवी दिशा व सक्षम भारत

August 24, 2026

ड्रग्ज, वाढीव पोलिस कोठडी – नगरसेवक मिर्झा व सुतार आरोपी, तपासात प्रगती, सेवन करणारे रडारवर

August 24, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp