Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

साई कला केंद्र सील, गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश – कला केंद्रच अनधिकृत, परवाना नसताना होते सुरु

समय सारथी by समय सारथी
October 17, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
1.2k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव येथील नियम व अटी मोडणाऱ्या कला केंद्राविरोधात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. आळणी येथील साई कला केंद्र हे गेल्या काही वर्षापासुन अनधिकृतरित्या सुरु असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने हे कला केंद्र तात्काळ सील केले आहे. कला केंद्र मालकावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले असुन त्यासाठी तहसीलदार मृणाल जाधव यांना प्राधिकृत केले आहे. 

परवाना नसताना हे कला केंद्र सुरु होते असा अहवाल तहसीलदार यांनी दिला मूळ संचिकेचे अवलोकन केले असता आळणी येथे साई लावणी लोकनाट्य कला केंद्र चालविण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे आढळून आलेले नाही त्यामुळे हे कला केंद्र अनधिकृत असल्याचे जाहीर केले. अनधिकृत साई लोकनाट्य कला केंद्र बंद (सिल) करण्याबाबत तात्काळ संयुक्तपणे नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी  कार्यालयास सादर करावा. या प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद केले आहे.

साई सांस्कृतिक कला केंद्राचे अनुषंगाने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अटी व नियम मोडल्याने सांस्कृतिक कला केंद्रास देण्यात आलेला परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी पाठवला होता त्यावर जिल्हाधिकारी यांनी कला केंद्र सील करण्याचा व गुन्हे नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील तुळजाई, येडशी येथील पिंजरा कला केंद्र परवाना रद्द करून पिंजरा व साई कला केंद्र सील केले आहे तर नटरंग व चंद्राई कला केंद्र परवाना प्रस्तावात कागदपत्रे त्रुटी असल्याने अर्ज फेटाळला आहे. महाकाली कला केंद्राचा परवाना रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव, चोराखळी, येडशी हा भाग कला केंद्राच माहेरघर बनला असुन जुने नवीन असे जवळपास 12 ते 15 केंद्र येथे असणार आहेत. काही कला केंद्राच्या ठिकाणी हाणामारीचे गंभीर प्रकार घडले असुन तेथील काही नर्तिका खुन, आत्महत्यास प्रवृत्त करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी आहेत. 

बंद खोलीत कला सादर केल्यास कायदेशीर कारवाई करू अश्या नोटीसा पोलिसांनी दिल्या आहेत, कला मंचावर कला सादर करावी, ग्राहकांना तिकीट द्यावे असा नियम आहे मात्र सर्रास स्वतंत्र बंद खोलीत हा प्रकार सुरु होतो, पारंपरिक पद्धती ऐवजी डीजे लावुन लावणीच्या नावाखाली ‘छमछम’ सुरु आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने कारवाई करू नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे. 

नवीन कला केंद्राना परवाने द्यावे यासाठी सत्ताधारी पक्षातील एक नेता एक शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना भेटला मात्र त्यांनी फटकारत चांगलेच सुनावले. लावणी लोककलेच्या नावाखाली डीजे व ‘छमछम’ त्याला जोडधंदा म्हणून दारू विक्री, नर्तकीच्या ‘खास बैठका’ यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने काही धनवान व प्रतिष्ठित मंडळी या व्यवसायात पुर्ण क्षमतेने उतरले आहेत. काही जणांची छुपी गुंतवणूक यात आहे. 

Previous Post

पवनचक्की कंपनी व शेतकरी यांच्यात पुन्हा मोठा संघर्ष – अधिकारी यांना 24 तास बसवून ठेवले, शेतकरी आक्रमक 

Next Post

27 ऑक्टोबरपासुन धाराशिव नगर परिषदेचे विशेष लेखापरीक्षण – तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे व फड यांच्या अडचणीत वाढ, आमदार सुरेश धस यांची तक्रार

Related Posts

महाराष्ट्र

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026
महाराष्ट्र

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
महाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच – अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

August 25, 2026
महाराष्ट्र

निलंबन – महावितरण अधीक्षक अभियंता आडे यांच्यावर कारवाई

August 25, 2026
महाराष्ट्र

गुंतवणूक परिषद – 37 उद्योग, 7 हजार 534 कोटींचे करार – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

August 25, 2026
Next Post

27 ऑक्टोबरपासुन धाराशिव नगर परिषदेचे विशेष लेखापरीक्षण - तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे व फड यांच्या अडचणीत वाढ, आमदार सुरेश धस यांची तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

1 कोटींचा गद्दार – धाराशिव शहरात बॅनर बाजी, पक्षांतर, भाजपने लावले बॅनर

August 27, 2026

ऑपरेशन टायगर – 4 नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते प्रवेश, धाराशिव नगर परिषदेत सत्ताकारण

August 27, 2026

ठरलं – ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे गटात जाणार, ऑपरेशन ‘टायगर’

August 26, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp