उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरासह तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून काल केवळ 2 अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
उस्मानाबाद शहरातील खाजा नगर भागातील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो जिल्हा शासकीय रूग्णालय येथील कर्मचारी आहे तर दुसरा रुग्ण तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील आहे.उस्मानाबाद शहरातील 5 भाग प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले असून हे भाग सील करण्यात आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 333 रुग्ण सापडले असून त्यापैकी 213 रुग्ण हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर 106 जणांवर उपचार सुरू आहेत, 14 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.96 टक्के समाधानकारक असून मृत्यू दर 4.20 टक्के इतका आहे अशी माहिती डॉ सतीश आदटराव यांनी दिली.