धाराशिव – समय सारथी
खालील PDF file Download करुन आपले नाव तपासा
गैरहजर,स्थलांतरित व दुबार मतदारांची सुनावणी – रहिवासी पुरावे व म्हणणे दाखल करण्याची शेवटची संधी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील ज्या मतदारांचे नाव धाराशिव तालुक्यातील ३६२ यादी भागांमध्ये समाविष्ट आहे,अशा सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गैरहजर,स्थलांतरीत,मयत,दुबार असे मतदार या यादी भागामध्ये आढळून आले आहे, अशा मतदारांचे नाव वगळण्यासाठी त्यांना त्यांच्या मतदार यादीतील पत्त्यावर नोटीस बजावणी करण्यात आली आहे.
संबंधित मतदार सर्वसाधारण मागील 6 महिन्यापासून सदरच्या पत्त्यावर राहात नसल्यामुळे ही नोटीस संबंधित मतदाराला प्राप्त न झाल्याने त्या मतदाराला आपले लेखी म्हणणे सादर करण्याची अंतिम संधी मिळावी यासाठी हे जाहीर आवाहन तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी केले आहे.
वेळापत्रकानुसार सुनावणीसाठी संबंधीत अधिकारी यांचे समोर तहसिल कार्यालय धाराशिव येथे वैयक्तिकरित्या अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर राहून रहिवासी पुरावे व आपले म्हणणे मांडावे.मतदारांसाठी ही सुनावणीची अंतिम संधी आहे.