धाराशिव – समय सारथी
बहुचर्चित तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात आरोपी विनोद गंगणे यांना कोर्टाने जामीन नाकारल्या नंतर पोलिसांनी त्यांना कोर्ट परिसर बाहेर ताब्यात घेत अटक केली. गंगणे यांच्या अटकेने सेवन गटाला मोठा धक्का बसला आहे. जामीन नाकारल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी गंगणे यांना 72 तासाचा दिलासा द्यावा अशी मागणी केली होती मात्र तो अर्ज सुद्धा फेटाळला. धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात सक्षमपणे कायदेशीर बाजु मांडली तर तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी तपासातील मुद्दे ठळकपणे मांडले.गंगणे हे तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीचे मुख्य मोहरक्या असल्याचे कोर्टात मांडले.
गंगणे यांचा सेवना बरोबरच इतर सहभाग कोर्टाने अधोरेखित केला, त्यांनी तब्ब्ल 12 लाख पेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज वेळीवेळी खरेदी केले असे पोलिस व सरकारी वकिलांनी सांगितले. कॅश देऊन दुसऱ्याच्या नावाने 1 लाख 85 हजार रुपयांचे शांत डोक्याने कट रचित केलेली ड्रग्ज खरेदीसह अन्य मुद्दे अडचणीचे व महत्वाचे ठरले.
ड्रग्ज तस्करीत तामलवाडी येथे 15 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करुन तब्बल 10 हजार 744 पानाचे चार्जशीट कोर्टात दाखल केले त्यात पोलिसांनी आजवर 37 जणांना आरोपी केले आहे. 31 मे रोजी गंगणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली त्यात त्यांना पुढील सुनावणी 6 जुन पर्यंत तात्पुरता दिलासा दिला होता, त्यावर आज 6 जुनला सुनावणी झाली. गंगणे हे सेवन गटात असुन ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचे खबरी आहेत. गंगणे यांच्या विरोधात अनेक पुरावे असल्याची बाब तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी सांगितली.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत दोषारोपपत्र दाखल करताना तस्कर व सेवन असे 2 गट केले असुन 37 पैकी 27 आरोपी तस्कर गटात तर गंगणेसह 10 सेवन गटातील आरोपीना कलम 27 लावले होते मात्र गंगणे यांचा सहभाग केवळ सेवन पुरता मर्यादित नसुन ते कटात सहभागी असल्याचा युक्तिवाद ऍड महेंद्र देशमुख यांनी केला.
ड्रग्ज गुन्ह्यात 17 तस्कर व 2 सेवन गटातील असे 19 आरोपी अटकेत आहेत तर 18 आरोपी फरार आहेत. तस्कर गटातील 27 पैकी 10 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 8 आरोपी फरार आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.